ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानने नुकतेच इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. सध्या ती जुन्या काळातील किस्से सोशल मिडियावर शेयर करत आहे. गुरुवारी तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला जो १९७७ मधील सत्यम शिवम सुंदरम चित्रपटामधील लुक टेस्ट दरम्यान क्लिक केला गेला होता. झीनतने सांगितले कि चित्रपटामध्ये रूपाची भूमिका केल्याबद्दल तिच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप आहे.
झीनत अमानने सांगितले कि हा फोटो फोटोग्राफर जेपी सिंघलने १९७७ दरम्यान सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाच्या लुक टेस्टसाठी क्लिक केला होता. यासाठी आरके स्टुडीओमध्ये फोटोशूट झाले होते. कॉस्ट्यूम ऑस्कर विनर भानु अथियाने डिझाईन केला होता. बॉलीवूडच्या इतिहास जाणणाऱ्या प्रत्येकाला माहीत असेल की, सत्यम शिवम सुंदरममधील माझ्या रुपा या व्यक्तिरेखेवरून त्यावेळी खूप वाद आणि गदारोळ झाला होता.
झीनतने उघडपणे आपल्या भूमिकेवरून झालेल्या वादाचा खुलासा केला. तिने लिहिले आहे कि या भूमिकेबद्दल लोकांनी केलेल्या अश्लीलतेच्या आरोपांनी मला नेहमीच आश्चर्यचकित केले कारण मला मानवी शरीरामध्ये काहीच अश्लील मिळाले नाही आणि वाटले नाही.
मी दिग्दर्शकानुसार काम करत होते आणि हा लुक माझा कामाचा भाग होता. रूपाची स्टोरी मूळ नाही, तर एक भाग होता. असे देखील नव्हते कि हा सीन प्राईव्हेट शूट केला गेला होता. हा सीन अनेक क्रू मेंबर्सच्या समोर शूट केला गेला होता. या सीनची अनेकवेळा रिहर्सल झाली आणि नंतर तो शूट झाला.
दिग्दर्शक राज कपूरने मला या चित्रपटामध्ये काम दिले होते. पण माझ्या वेस्टर्न इमेजमुळे ते खूप चिंतेत होते. ते हे निश्चित करू शकत नव्हते कि दर्शक मला या अवतारामध्ये स्वीकार करतील का नाही. अशामध्ये त्यांनी लुक टेस्ट केला. नंतर या टेस्टच्या आधारावर आम्ही १९५६ दरम्यान आलेल्या जागते रहो मधील लता जीच्या जागो मोहन प्यारे या प्रसिद्ध गाण्यावर एक रील शूट केली होती. माझ्या या भूमिकेबद्दल डिस्ट्रिब्यूटर्सचे मत जाणून घेण्यासाठी आरके स्टुडीओमध्ये या रीलची स्क्रीनिंग केली गेली होती.
स्क्रीनिंगनंतर चित्रपटाचे राइट्स तत्काळ प्रभावाने विकण्यात आले. विशेष म्हणजे झीनत अमानने ११ फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर डेब्यू केला होता. आता त्यांचे २०.८ हजार फॉलोअर्स झाले आहेत आणि फॉलोअर्सची संख्या वाढतच चालली आहे.
View this post on Instagram