भारतीय क्रिकेट टीमचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. युजवेंद्र चहलने प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्मासोबत लग्न केले आहे. सध्या सोशल मीडियावर युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून नेटिझन्स क्रिकेटर नशेत असल्याबद्दल बोलत आहेत. आता या व्हिडिओमुळे युजवेंद्र चहलला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.
नुकताच युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल व्यवस्थित चालताना दिसत नाही, त्यामुळे एक व्यक्ती चहलला धरून चालत आहे. यानंतर युजवेंद्र चहल कारमध्ये बसताना खूपच अस्वस्थ दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेटवर युजवेंद्र चहलबद्दल अशी चर्चा सुरू झाली आहे की तो दारूच्या नशेत आहे.
युजवेंद्र चहलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल होऊ लागला असून आता युजवेंद्र चहलला खूप ट्रोल केले जात आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘भाऊ, काय झाले, धनश्री निघून गेली?’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘तु अय्यर आणि धनश्रीला एकत्र पाहिले आहे का?’
इतकंच नाही तर आणखी एका यूजरने युजवेंद्र चहलबद्दल विचारलं आहे की, ‘भाऊ, वहिनीच्या टेन्शनमध्ये दारू जास्त झाली आहे.’ अशाप्रकारे अनेक लोक युजवेंद्र चहलला चांगलेच ट्रोल करत आहेत. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर यांचे फोटो-व्हिडिओबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा नेहमी समोर येत असतात. त्यामुळे चहलला अनेकदा ट्रोलही केले जाते.
12yr old me after drinking Appy Fizz #yuzvendrachahal pic.twitter.com/I9mMe2oPVE
— Tweetera🐦 (@DoctorrSays) April 29, 2023