युट्युबर बनण्याच्या अगोदर अरमान मलिक टिक टॉक स्टार होता. काही महिन्यांआधी अरमान मलिक ने एक युट्युब व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओ मध्ये त्याने सांगितले होते कि त्याच्या जवळ घर गाडी आणि पैसे आहेत. त्याच्या कष्टाच्या जोरावर अरमान मलिक एका राजा सारखे जीवन जगत आहे.
पण कधीकाळी एक वेळ होती जेव्हा तो एका लहानशा घरात राहत होता. त्याचे राहणीमान आताच्या सारखे लग्जरीयस नव्हते. चाहत्यांना अरमान मलिक चे व्हिडीओ आवडू लागले. त्यानंतर त्याने कधी फिटनेस व्हिडीओ शेअर करत असे तर कधी त्याची लव स्टोरी. त्याव्यतिरिक्त अरमान मलिक ने म्युजिक व्हिडीओज मध्ये देखील काम केले आहे.
युट्युबर अरमान मलिक त्याच्या व्हिडीओमुळे कायम चर्चेत येत असतो. परंतु यावेळी त्याला सोशल मिडीयावर ट्रोल केल जात आहे. अरमान मलिक च्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट आहेत. कृतीक आणि पायल यांच्या बेबी बंप सोबत अरमान मलिक ने फोटो शेअर केला होता. याबाबत नागरिकांच्या कडून नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या या मुद्यावर खूप गोष्टी झाल्या आहेत. आता पाहूया अरमान मलिक च्या लग्जरी जीवनाबद्दल.
टिक टॉक बंद झाल्यानंतर अरमान मलिक ने युट्युब व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. हळूहळू अरमान ने युट्युब वर कृतिका आणि पायल सोबत व्हिडीओ टाकायला सुरुवात केली. त्यानंतर अरमान च्या व्हिडीओंना खुप लाईक आणि व्युज मिळू लागले.
हे अरमान मलिक च्या यशाचे पहिले पाऊल होते. आता अरमान मलिक प्रत्येक दिवशी पुढे जाण्यासाठी आणखी मेहनत करू लागला. चाहत्यांना अरमान मलिक चे व्हिडीओ आवडू लागले. अरमान व्हिडीओ च्या सोबत म्युजिक व्हिडीओ मधून चांगली कमाई करू लागला. काही दिवसांपूर्वी अरमान मलिक ने एक अलिशान घर खरेदी केले आहे. कृतिका आणि पायल मलिक ने यांनी चाहत्यांच्या विनंतीवरून घरातील व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
अरमान मलिक च्या घरातील व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आला असेलच कि त्याच्या स्वप्नातील घर किती अलिशान हॉटेल पेक्षा कमी नाही. महागड्या घराव्यतिरिक्त अरमान मलिक जवळ लग्जरी गाड्या देखील आहेत. माहितीनुसार अरमान मलिक च्या जवळ लग्जरी गाड्या देखील आहेत. अरमान मलिक ची कमाई जवळपास १.७ करोड रुपये आहे. अरमान मलिक चे खरे नाव संदीप आहे. सोशल मिडीयावर संदीप ला अरमान नावाने प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे त्याने त्यालाच आपली ओळख बनवली. अरमान त्याच्या पत्नींच्या सोबत आनंदी जीवन जगत आहे. तर कृतिका आणि पायल यांना देखील एकमेकींच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही.