HomeViralयूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायकांनी शेयर केला त्यांच्या प्राईव्हेट स्पेसचा व्हिडीओ, म्हणाली;...

यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायकांनी शेयर केला त्यांच्या प्राईव्हेट स्पेसचा व्हिडीओ, म्हणाली; ‘आम्ही इथेच तिघे एकत्र…’

यूट्यूबर आणि व्हिडिओ क्रिएटर अरमान मलिक आणि त्याची पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कृतिका आणि पायल दोघी आपल्या प्रेग्नंसीचा आनंद घेत आहेत. सध्या पायल आणि कृतिका एकत्र गरोदर असल्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे. दरम्यान त्यांचे इन्स्टा रील्स, व्हिडिओ आणि यूट्यूब व्हिडिओही खूप व्हायरल होत आहेत. पायल आणि कृतिकाने नुकतेच अरमान मलिकच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या आपल्या नवीन घराची झलक दाखवत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी एक मोठा कस्टमाइज्ड बेड देखील दाखवला आहे जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडिओमध्ये पायल मलिक आणि कृतिका मलिक सांगत आहेत कि त्या प्रेग्नंसी संबंधित काही टेस्ट आणि स्कॅन करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेल्या होत्या. कृतिका आपले मेडिसिन देखील दाखवते. यानंतर कृतिका आणि पायल आपल्या घराची एक हलकी झलक दाखवून संपूर्ण घर दाखवण्यास मनाई करतात. पण त्या आपल्या सर्वात फेवरेट आणि खास जागा दाखवतात.

पायल मलिक आणि कृतिका मलिक यांची खास जागा त्यांची बेडरूम आहे. या बेडरूममध्ये एक मोठा बेड आहे. पायलचे म्हणणे आहे कि हा बेड त्यांनी कस्टमाइज्ड केला आहे, ज्यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब ती, कृतिका, अरमान आणि त्यांचा मुलगा येऊ शकतील. त्यांनी बेडच्या साईडला एक मिररवर लावलेली लाईट देखील दाखवली.

कृतिका मलिक म्हणते हा मास्टर बेड आम्ही स्पेशल बनवून घेतला आहे. जेणेकरून आम्ही सर्वजण एकत्र झोपू शकू. आधीच्या घरामध्ये इकडे तिकडे झोपावे लागायचे, कारण तिथे बेड छोटे होते. य्नान्त्र ती म्हणते कि त्यांनी गादी देखील स्पेशल बनवून घेतली आहे. पायल याला अधिक विस्ताराने सांगताना म्हणते कि आता कुटुंब आणखी मोठे होणार आहे, यामुळे हा बेड बनवला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts