युट्युबर अरमान मलिक सध्या खूपच चर्चेमध्ये आला आहे. अरमान आता चार मुलांचा बाबा झाला आहे. त्याचे स्वप्न होते कि त्याच्या घरामध्ये चार लहान पाहुणे यावेत, ज्याचा खुलासा त्याने स्वतः एका व्लॉगमध्ये केला होता. शेवटी त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी पत्नी कृतिकाने एका मुलाला जन्म दिला होता आणि आता त्याची पहिली पत्नी पायलने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. जुळ्या मुलांचे घरी भव्य स्वागत करण्यात आले.
पायल मलिकने काही दिवसांपूर्वी एक मुलगा आणि एक मुलीला जन्म दिला होता. तिला नुकतेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कृतिकाने पायलचे घरी भव्य स्वागत केले. कृतिकाने सम्पूर्ण घर फुग्यांनी सजवले आणि गुलाबाच्या पाकळ्या खाली पसरल्या होत्या. फुलांची माळ आणि मुलांच्या पायाचे ठसे उमटवत पायल आपल्या मुलांसोबत घरामध्ये आली.
कृतिकाच्या या भव्य स्वागताचे पायलने खूप कौतुक केले. पायलने देखील म्हंटले कि ती तिचे भव्य स्वागत करू शकली नाही, पण तिला विश्वास होता कि कृतिका स्वागतामध्ये काहीच कसर सोडणार नाही. संपूर्ण मलिक कुटुंब लहानग्यांच्या आगमनामुळे आनंदी आहे. पायलने म्हंटले कि तिच्या मुलीच्या आगमनाने आता त्यांचे आयुष्य आणखीन चांगले होईल.
पायल मलिकच्या जुळ्या मुलांचे नाव खूपच गोड आहे. तिच्या मुलाचे नाव अयान आणि मुलीचे नाव तुबा आहे. पायलला आणखी एक मुलगा आहे ज्याचे नाव चिरायू आहे. तर कृतिकाने आपल्या लाडक्या मुलाचे नाव जैद ठेवले आहे.