देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीची पत्नी नीता अंबानी आपल्या साधेपणा आणि सौंदर्याने सर्वांचे मन जिंकत असते. नेहमी आनंदी दिसणारी नीता अंबानीच्या आयुष्यामध्ये असा देखील क्षण आला होता जेव्हा ती पूर्णपणे खचली होती. वास्तविक २३ व्या वर्षी डॉक्टरांनी तिला सांगितले होते कि तू कधी आई होणार नाहीस. हे ऐकल्यानंतर नीता अंबानीला मोठा धक्का बसला होता.
प्रत्येक महिलेचे स्वप्न असते कि ती आपल्या मुलाला आपल्या कुशीमध्ये खेळवेल पण तिच्यासाठी हे सोपे नव्हते. एका मुलाखतीमध्ये स्वतः नीता अंबानीने याचा उल्लेख केला होता. नीता अंबानीने सांगितले होते कि लग्नाच्या काही वर्षांनंतर तिला डॉक्टरांनी सांगितले होते कि ती कधी मुलाला जन्म देऊ शकणार नाही.
नंतर तिची जवळची दोस्त डॉ. फिरुजा पारिखच्या मदतीने पहिल्यांदा जुळी मुले कंसीव केले. नीता अंबानीच्या जुळ्या मुलांचा जन्म २ महिन्यांच्या अगोदरच झाला होता. सात महिन्यांच्या प्रेग्नंसीमध्ये तिने आकाश आणि ईशा अंबानीला जन्म दिला होता. यानंतर ३ वर्षानंतर तिला नॅचरल कंसीव झाले आणि तिने एका मुलाला जन्म दिला ज्याचे नाव अनंत अंबानी ठेवले.
स्वतः ईशा अंबानीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि ती आणि तिचा जुळा भाऊ आकाश आईवीएफ बेबी आहेत. लग्नाच्या ७ वर्षानंतर नीता अंबानीने आईवीएफद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मुलांच्या जन्मानंतर नीता अंबानीने आपला सर्व वेळ मुलांचा सांभाळ करण्यास दिला आणि ५ वर्षानंतर ती कामावर परतली होती.
मुकेश अंबानीने जेव्हा पहिल्यांदा मुलांना पाहिले होते तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता, त्यांनी ठरवले कि तेच त्यांच्या दोन्ही मुलांची नावे ठेवतील. त्यांनी म्हंटले कि त्यांचे प्लेन पर्वतांवरून उडत होते तेव्हा त्यांना हि आनंदाची बातमी मिळाली होती. यामुळे त्यांनी आपल्या मुलीचे नाव ईशा आणि ते हवेत उडत होते म्हणून मुलाचे नाव आकाश ठेवले. ईशाचा अर्थ पर्वतांची देवी असा होतो. आता नीता अंबानी प्रमाणेच ईशाने देखील जुळ्या मुलांना जन्म दिला आहे ज्यांची नावे आदिया आणि कृष्णा ठेवले आहे. जुळ्या मुलांच्या आगमनाने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी देखील खूप खुश आहेत.
View this post on Instagram