प्रत्येक निवडणुकीचा एक चेहरा ठरलेला असतो. जसा प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो ज्याच्यामुळे सर्व काही बदलून जाते. कधी कधी निवडणुकीमध्ये एक सामान्य व्यक्ती देखील चेहरा बनते. असेच काही एका महिलेसोबत घडले, निवडणूक म्हंटले कि सर्वात आधी डोळ्यासमोर त्या महिलेचा चेहरा येतो.
निवडणूक म्हंटल कि ती महिला अधिकारी समोर येते. मतमोजणी म्हटलं की लिंबू कलरची साडी घातलेली महिला डोळ्यांसमोर येते. आता जणू काही हे समीकरण बनले आहे. नुकताच गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी झाली.
यामध्ये भाजप आपली सत्ता राखणार का नाही यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण काहीही असो पण लिंबू कलरच्या साडीमधील महिला मतमोजणीमध्ये भाव खावून जाते. मतमोजणी बाजूला राहते आणि हि महिला अधिकारी जास्त चर्चेमध्ये राहते.
या महिलेचे नाव रिना द्विवेदी आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी रिना द्विवेदी यांनी उत्तर प्रदेशामध्ये लखनऊ येथे एका मतदान केंद्रामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम केले होते, त्यावेळी त्यांनी केंद्रामध्ये जाताना पिवळी साडी नेसली होती.
त्यानंतर त्यांचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. यानंतरच त्या लिंबू कलरची साडीवाली महिला म्हणून ओळखले जाऊ लागले. हि महिला अधिकारी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली होती जेव्हा ती लखनऊच्या मोहनलालगंज विधानसभेच्या गोसाईगंज निवडणूकीमध्ये अधिकारी म्हणून ड्युटीवर आली होती. पण त्यावेळी त्यांचा अंदाज पूर्णपणे बदललेला होता त्या वेस्टर्न ड्रेसमध्ये पाहायला मिळाल्या होत्या.
View this post on Instagram
View this post on Instagram