HomeEntertainment‘मी कन्नडिगा आहे, पण घमंड...’ मुलाखतीदरम्यान KGF स्टार यश भडकला, केले असे...

‘मी कन्नडिगा आहे, पण घमंड…’ मुलाखतीदरम्यान KGF स्टार यश भडकला, केले असे वक्तव्य…

२०२२ मधील सर्वात मोठा चित्रपट ब्रह्मास्त्र, द कश्मीर फाइल्स, RRR नाही तर एक असा चित्रपट होता ज्याने भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये बॉक्स ऑफिसवर देखील कमाल केली आहे. पण पैसेच नाही तर केजीएफने अँग्री यंग मॅनची इमेज पुन्हा एकदा चित्रपटामध्ये आणली आहे. या चित्रपटामधून रॉकिंग स्टार यशला अमाप लोकप्रियता मिळाली.

इवेंटदरम्यान यशला विचारले गेले कि तुला केजीएफ १ आणि २ चित्रपटाच्या यशामुळे किती आनंद मिळाला. आज बेंगलोरमध्ये अनेक ऑटो रिक्शा वाले पाहायला मिळतात जे रॉकी भाईचा टी-शर्ट घातलेली दिसतात. आज यश सध्या भारतामधील बड्या स्टार पैकी एक आहे. तू कधी विचार केला होतास का कि केजीएफ इतका मोठा बनेल किंवा तू यावर श्योर नव्हतास.

तो म्हणाला कि माझे म्हणणे ऐकल्यानंतर मला घमंडी म्हणू नका, पण माझी खूप दिवसांपासून इच्छा होती कि असे व्हावे, आणि मी याची स्वप्ने पाहत होतो. मी जवळजवळ ५-६ वर्षे याची वाट पाहिली. जर कोणी मला विचारते कि मला याबदल कसे वाटते तेव्हा म्हणतो कि मी यासाठी अनेक वर्षे जगत आहे तर याचा जास्त काही परिणाम माझ्यावर झाला नाही. आता मी पुढचा विचार करत आहे. मला हा फेम हवा होता. होय मी सक्सेसच्या स्केलने जरूर सरप्राइज झालो होतो. पण मी मानतो कि भारत एक असा देश आहे ज्यामध्ये खूप टॅलेंट आहे. आपल्यामध्ये क्षमता आहे. जर आपण एकत्र आलो तर कमाल करू शकतो.

साउथ सिनेमा, ब्लॉकबस्टरवर ब्लॉकबस्टर देत आहे. बॉलीवूड चित्रपटांदरम्यान एक कन्नड़ स्टार येतो आणि वाहवा मिळवून जातो. अशामध्ये यशला विचारले गेले कि साऊथच्या चित्रपटांना मिळणाऱ्या सफलतेबद्दल काय म्हणणे आहे. यावर यश म्हणाला कि १० वर्षांपासून इथे डबिंग वाले चित्रपट लोकप्रिय होऊ लागले. सुरुवातीला साऊथच्या चित्रपटांची खिल्ली उडवली जायची. अशीच याची सुरुवात झाली होती. लोक म्हणायचे कि साऊथचा चित्रपट कुठल्यातरी चॅनलवर येतोय. हि काय अॅक्शन आहे काय, उडत आहेत सगळे. पण हळू हळू याला पसंद केले जाऊ लागले. लोकानी त्या आर्ट फॉर्मला समजायला सुरुवात केली.

तो पुढे म्हणाला कि, प्रोब्लेम हा होता कि आमचे चित्रपट कमी रेटवर विकले जायचे आणि याची डबिंग खराब केली जात होती. त्यानी खराब प्रकारे फनी नावांनी याला प्रेजेंट केले. माझ्यासोबत देखील असे झाले आहे लोक मला रॅम्बो सर आणि ग्रेट लायन म्हणून बोलवायचे मी विचार करायचो कि हे काय म्हणत आहेत. मी मानतो कि राजमौली सरने साऊथमध्ये जबरदस्त प्रोजेक्ट बनवण्याची सुरुवात केली. त्याआधी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते. बाहुबलीने लोकांवर परिणाम केला आणि केजीएफ वेगळ्या विचाराने बनवला गेला. आम्ही खूपच थोड्या बजटने सुरुवात केली होती. आता लोकांनी साऊथ चित्रपटांना समजायला सुरुवात केली आहे आणि हा टाईम चांगला आहे.

रजनीकांत आणि तमिळ चित्रपट लोकांमध्ये फेमस झाले, मलयालम चित्रपट फेमस झाले आणि आता कन्नड चित्रपट फेमस होत एह्त. कांतारा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. असे काय झाले कि कन्नड चित्रपट फेमस होत आहेत. यशने उत्तर दिले कि, आम्हाला अॅटीट्यूडमध्ये शिफ्ट आणण्याची गरज होती, लोक टॅलेंटबद्दल बोलत असत पण जेव्हा तुम्ही समोर येत तेव्हा लोक तुम्हाला जज करतात. यामुळे बदलायला वेळ लागतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts