भोजपुरी अभिनेत्री यामिनी सिंहच्या वक्तव्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीमध्ये पवन सिंहवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. अभिनेत्रीने सांगितले कि पवन महिलांचा सन्मान करत नाही. इतकेच नाही तर चित्रपटाच्या शुटींग दरम्यान रात्री उशिरा कॉल करून स्टुडीओमध्ये बोलावले, ज्यामुळे अभिनेत्रीने चित्रपट करण्यास नकार दिला होता. पवन सिंहवर लावलेल्या या आरोपांमुळे चाहते भडकले आणि सोशल मिडियावर अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल केले. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओवर पवनचे चाहते कमेंटचा पाऊस पाडू लागले ज्यानंतर अभिनेत्रीचे कमेंट सेक्शन बंद केले.
यामिनी सिंहने एका मुलाखतीदरम्यान पवन सिंहच्या वास्तवाचा खुलासा केला आणि म्हणाली कि मला माझा पहिला चित्रपट पवन सिंहने नाही तर दिग्दर्शक अरविंद चौबेने दिला होता. या चित्रपटामधून मला पवन सिंह किंवा कोणी काढले नाही तर मी माझ्या मर्जीने चित्रपट सोडला.
यामिनीने त्या रात्रीचा उल्लेख करत म्हंटले कि जेव्हा तिला पहिला चित्रपट सोडवा लागला होता. ती म्हणाली कि रात्री उशिरा मला फोन आला कि ऑटो पकडून स्टुडिओत ये. जेव्हा यामिनीने विचारले कि यावेळी ती कशी येऊ शकते तेव्हा समोरून उत्तर आले कि तुला चित्रपट करायचा आहे का नाही. ज्यानंतर तिने लगेच चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.
यामिनीने आपले बोलणे पूर्ण करत म्हंटले कि पवन सिंह माझा फेवरेट सिंगर आहे आणि पुढे देखील राहील. पण जर तुम्ही घाणेरडे काम करण्यास सांगाल तर मी नाही करणार. मला काही कमी नाही आणि मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. अभिनेत्रीने पवन सिंहच्या चाहत्यांना प्रश्न विचारत म्हंटले कि त्यांच्या आई, बहिणीसोबत एखादे चुकीचे काम सांगितले तरीही तुम्ही अंधळे भक्त बनून राहणार का.
View this post on Instagram