HomeCricketमहिलांच्या आयपीएलच्या सर्व संघांची नावे झाली जाहीर, पहा कोणत्या संघाला काय नाव...

महिलांच्या आयपीएलच्या सर्व संघांची नावे झाली जाहीर, पहा कोणत्या संघाला काय नाव मिळाले…

२०२३ मध्ये पहिल्यांदाच महिला आयपीएल सुरु होणार आहे. महिला आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी खेळप्रेमी खूपच उत्सुक आहेत. माहितीनुसार येणाऱ्या ४ मार्च पासून ते २६ मार्च पर्यंत महिला आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. ज्यासाठी सर्व संघांची निवड करण्यात आली आहे.

महिला आयपीएलच्या २०२३ च्या उद्घाटन सतरासाठी संघांच्या नावाचे अनावरण देखील करणायत आले आहे. ज्यामध्ये गुजरात जायंट्स, मुंबई इंडियंस, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्सच्या नावांचा समावेश आहे. लखनऊ टीमच्या नावामध्ये बदल करून यूपी वॉरियर्स ठेवण्यात आले आहे.

सर्व संघांसाठी आता खेळाडूंचा लिलाव १३ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. महिला आयपीएल २०२३ साठी एकूण १५०० महिला खेळाडूंच्या नावाची एन्ट्री दाखल करण्यात आली आहे. आता हे पाहावे लागेल कि कोणता संघ कोणत्या खेळाडूला आपल्या संघामध्ये सामील करतो.

महिला आयपीएल टूर्नामेंटमध्ये फक्त एक एलिमिनेटर राउंड खेळला जाणार आहे. ५ मधील फक्त ३ च संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील. आता तालिकेमध्ये जो संघ जास्त अंकाने वरती राहील त्याला थेट फायनल एंट्री मिळेल. तर जो संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहील त्याला एलिमिनेटर राउंड खेळावा लागेल.

जो संघ अंक तालिकेमध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहील त्या संघाचा प्रवास तिथेच थांबेल. महिला आयपीएल २०२३ मधील पहिला सामना अहमदाबाद आणि मुंबईदरम्यान खेळला जाणार आहे. हि टूर्नामेंट एकूण २३ दिवस चालणार आहे. ज्यामध्ये २२ सामने खेळले जाणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts