संपूर्ण जग जरी आधुनिक युगामध्ये जगत आहे आणि महिला आणि पुरुषांमध्ये कोणताही भेदभाव नाही पण जगामध्ये असे अनेक भाग आहेत जिथे आज देखील अनेक विचित्र प्रथांचे पालन केले जाते. ज्यासाठी खास करून महिलांवर जबरदस्ती केली जाते. आज आपण भारतामधील अशा भागाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे महिलांना पाच दिवस बिना कपड्यांचे राहावे लागते. हि एक परंपरा आहे जी अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि यादरम्यान गावातील सर्व महिला याचे पालन करतात.
वास्तविक हे प्रकरण हिमाचल प्रदेशच्या मनीकर्ण खोऱ्यातील आहे. माहितीनुसार येथील पिणी गावामध्ये प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये महिला पाच दिवस कपडे घालत नाहीत. जर एखाद्या महिलेने असे केले नाही तर तिच्याबद्दल काही दिवसांनंतर वाईट बातमी ऐकायला मिळते. इतकेच नाही तर यादरम्यान संपूर्ण गावामध्ये पती-पत्नी एकमेकांसोबत बोतल नाहीत आणि एकमेकांपासून दूर राहतात.
माहितीनुसार या पाच दिवसांमध्ये पुरुषांसाठी देखील काही नियम असतात. यादरम्यान पुरुष दा रु किंवा मांसाचे सेवन करत नाहीत. अशी मान्यता आहे कि जर एखाद्याने या प्रथेने योग्यप्रकारे पालन केले नाही तर देवता नाराज होत्त आणि त्याचे नुकसान करतात. या प्रत्येमागे एक कथा देखील आहे, ज्यामध्ये हे सर्व केले जाते.
असे म्हंटले जाते कि अनेक वर्षांपूर्वी या गावामध्ये राक्षसांचा आतंक होता. यानंतर लाहुआ घोंड नावाचे देवता पिणी गावामध्ये आले आणि त्यांनी या राक्षसांचा वध करून गावाला वाचवले. हे राक्षस गावातील सजलेल्या, विवाहित आणि सुंदर कपडे घातलेल्या महिलांना उचलून घेऊन जायचे. देवताने राक्षसांचा वध करून महिलांना वाचवले. यानंतर हि परंपरा सुरु झाली.