९० च्या दशकामध्ये करिश्मा कपूर दर्शकांच्या मनावर राज्य करत होती. सलमान खानची ऑनस्क्रीन बीवी नंबर १ राहिलेली अभिनेत्री करिश्मा कपूरचे वैवाहिक आयुष्य खूपच खराब राहिले. घटस्फोट घेऊन भलेहि ती वेदनादायक जग्तून बाहेर आली पण तिच्यासोबत घडली सगळी कहाणी नेहमी बाहेर येत असते. ती आज आपल्या मुलांसोबत एक सुंदर आयुष्य जगत आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा ती आपल्या पर्सनल लाईफमधील त्रासामध्ये हरवून गेली होती.
अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिश्मा कपूरने २००३ मध्ये दिल्लीस्थित उद्योगपती संजय कपूरसोबत गुपचूप लग्न केले होते. सुरुवातीची काही वर्षे तिची खूपच चांगली गेली. पण नात्र तिचे आयुष्य नरकासारखे झाले. तिचा पती संजय कपूर तिला नेहमी मारहाण करत असे.
करिश्मा कपूरने पती संजय कपूरवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. तिने सांगितले कि संजय तिला एखाद्या शोपीस सारखा वागवतो. लग्ननंतर मला माहिती झाले कि त्याने माझ्यासोबत यासाठी लग्न केले आहे कारण मी एक फेमस अभिनेत्री होते. त्याला माझ्याद्वारे मिडियामध्ये प्रसिद्धीत राहायचे होते. तो मला त्याच्या मित्रांमध्ये एक ट्रॉफी सारखे वागवायचा. त्याला माझ्याद्वारे स्वत:ला लोकप्रिय बनवायचे होते.
करिश्मा कपूरने हे देखील सांगितले कि प्रेग्नंसी दरम्यान जेव्हा माझे वजन वाढले होते तेव्हा एकदा त्याने मला पोस्ट प्रेग्नंसीमध्ये घट्ट ड्रेस घालायला सांगितला होता. तेव्हा मी त्यामध्ये फिट झाले नव्हते, म्हणून त्याच्या आईला त्याने मला थप्पड मारायला सांगितली होती. लग्नानंतर अभिनेत्री चित्रपटांपासून दूर गेली होती. घटस्फोटानंतर करिश्माने संजयवर अनेक आरोप लावले होते. तिने म्हंटले होते कि प्रेग्नंसी दरम्यान त्याने मला खूप त्रास दिला होता. हनिमूनच्या वेळी तिच्या पतीने तिची बोली लावली होती.
लग्नाच्या ११ वर्षानंतर २०१६ मध्ये दोघे वेगळे झाले. करिश्मा मुंबईला शिफ्ट झाली आणि ती सिंगल मदर बनून तिची मुले समायरा आणि कियानचा सांभाळ करत आहे. भलेही करिश्मा कपूर मोठ्या पडद्यापासून दूर आहे पण ती रियालिटी शोमध्ये गेस्ट म्हणून पाहायला मिळत असते. याशिवाय ती मेंटलहुड वेबसिरीजमध्ये देखील दिसली होती. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील झाले होते.