गोविंदा आणि सुनिता यांच्या लग्नाला तीन दशकांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. परंतु आज देखील दोघांच्यात तेवढेच प्रेम आहे, जेवढे सुरुवातीला होते. गोविंदा आणि सुनिता यांच्याशी जोडलेल्या अशा अनेक घटना आहेत, ज्यांच्या बद्दल खूप कमी लोक जाणतात. एकदा गोविंदा, सुनिता ला डिनर डेट ला घेवून गेला होता, परंतु दारू पिण्याआधी त्याला त्याच्या आई ची परवानगी घ्यावी लागली होती.
गोविंदा आणि सुनिता ने हा खुलासा खूप वर्ष आधी सिमी ग्रेवाल चा चैट शो रेण्डेझ्वोउस विथ सिमी ग्रेवाल मध्ये केला होता. शो मध्ये सिमी ग्रेवाल ने विचारले की, गोविंदा रोमेंटिक आहे काय? त्यावर उत्तर देताना सुनिता सांगते की- ‘होय, कधी कधी’. त्यानंतर तिने त्या घटनेबद्दल सांगितले, जेव्हा तिने गोविंदा सोबत पहिल्यांदा शैपेन पिली होती. सुनिता सांगते की, ‘माझा वाढदिवस होता, तर तो मला डिनर साठी ताज हॉटेल मध्ये घेऊन गेला. त्यानंतर आम्ही शैपेन मागवली’.
गोविंदा ने सांगितले कि शैपेन पिण्याआधी मी मम्मी ला फोन करून विचारले कि मी पिऊ कि नाही पिऊ. ठीक आहे तू पिणार. त्याची सवय खूप वाईट असते, परंतु तुला एन्जॉय करायचा आहे तर एन्जॉय कर. त्यानंतर आम्ही शैपेन पिली आणि खूप नाचलो, परंतु एक आठवड्या पर्यंत त्याचा आम्हाला हेंग ओवर होता’. गोविंदा ने सांगितले कि, ‘आम्ही पहिल्यांदा असा एन्जॉय केला होता.
शो मध्ये सिमी ग्रेवाल ने सुनिता ला विचारले की जेव्हा कधी गोविंदा चे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा तो कधी तणावात येतो काय. याला उत्तर देताना सुनिता सांगते की, ‘नाही, तो कायम सामान्य राहतो. त्यामुळे काही फरक पडत नाही’.
त्यानंतर गोविंदा सांगतो की, ‘मला तर याच गोष्टीचा आनंद आहे कि मी चित्रपटामध्ये आहे. एकदा माझ्या आई ने एक चांगली गोष्ट सांगितली होती की, ‘१०० करोड च्या लोकसंख्येत १०० हिरो नाहीत. फक्त १० हिरो आहेत. १० मध्ये तू एक आहेस आणि तू निराश होत आहेस. एवढे जास्त देखील महात्वाकांक्षी होऊन चालत नाही.