अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचे नाव बॉलीवूडच्या चर्चित आणि परफेक्ट कपल्समध्ये घेतले जाते. आज आपण अक्षय कुमार आणि ट्विंकल संबंधी एक अशी घटना सांगणार आहोत ज्यामुळे खूपच वाद निर्माण झाला होता. वास्तविक हे प्रकरण २००९ मधील आहे.
२००९ मध्ये झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारच्या सांगण्यावरून असे काही केले होते कि ज्यामुळे खूपच वाद झाला होता. वास्तविक लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करत असलेला अक्षय कुमार थेट त्याची पत्नी ट्विंकल खन्नाच्या समोर जाऊन थांबला आणि त्याने तिला आपल्या जीन्सची चैन उघडण्यास सांगितले.
अक्षय कुमारची हि डिमांड ऐकून एक वेळ ट्विंकला देखील धक्का बसला होता, मात्र अक्षयचे ऐक्सून तिने जीन्सची चैन उघडली ओहटी. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. या पूर्ण घटनाक्रमवर लोकांनी टीकेची झोड उठवली होती.
यादरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने अक्षय आणि ट्विंकलविरोधात सार्वजनिक ठिकाणी अ श्ली लता पसरवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर ट्विंकल आणि अक्षयला पोलिसांनी अटक केली. माहितीनुसार ट्विंकलला ५०० रुपयांचा दंड भरून सोडून देण्यात आले. तर या घटनेनंतर अक्षय आणि ट्विंकलने त्यांच्या कृत्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती.