भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली नेण अलीकडे अलिबाग मध्ये अवास विलेज मध्ये एक अलिशान बंगला खरेदी केला आहे. विराट कोहली सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चालू असलेल्या ४ कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये आहे. अशा परिस्थितीत त्याचा मोठा भाऊ विकास कोहली याने अलिबाग मधील बंगला खरेदी करण्याची सर्व ओंपचारीकता पूर्ण केली आहे. विराट आणि अनुष्का यांची अलिबाग मधील ही काही पहिलीच खरेदी नाही. या जोडीने मागील वर्षी सप्टेंबर मध्ये अलिबाग मध्ये १९.२४ करोड रुपयांचे फार्महाऊस खरेदी केले होते. त्यांनी १.१५ करोड रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचीही माहिती आहे.
विराट कोहली ने अवास विलेज मध्ये २००० स्क्वेअर फुटच्या विला वर ६ करोड रुपये खर्च केले आहेत. त्याने या मालमत्तेवर मुद्रांक शुल्क च्या रूपाने ३६ लाख रुपये देखील भरले आहेत. सांगितले जाते कि या विला मध्ये ४०० स्क्वेअर फुट चा स्विमिंग पूल देखील आहे. बॉलीवूड अभिनेता संजय खान ची मुलगी आणि ऋतिक रोशन ची एक्स बायको सुजैन खान ने या प्रोजेक्ट चे इंटिरियर डिजाईन केले आहे.
अधिवक्ता महेश म्हात्रे हे अवास लिविंग अलिबाग एलएलपी चे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांनी सांगितले कि, “नैसर्गिक सौंदर्यामुळे अवास हे सेलिब्रिटींचे आवडतीचे ठिकाण आहे. त्याव्यतिरिक्त, मांडवा जेटी अवास पासून ५ मिनिटांच्या अंतरावर आहे आणि आता स्पीड बोट ने मुंबई पासूनचे अंतर होऊन १५ मिनिट झाले आहे”.
अलिबाग मध्ये जमिनीची किंमत जवळपास ३००० ते ३५०० रुपये स्क्वेअर फुट आहे आणि तसेच उच्चभ्रू वर्गासाठी हे एक आवडते विकेंड डेस्टीनेशन आहे. सांगितले जाते कि फक्त विराट कोहलीच नाही तर, भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार रोहित शर्मा ने देखील अलिबाग मध्ये जमीन खरेदी केली आहे. रोहित शर्मा ने २०२१ मध्ये म्हतरोली गावामध्ये चार एकर जमीन खरेदी केली होती.
तर, दुसरीकडे भारताने ऑस्ट्रेलिया ला मालिकेमध्ये पहिल्या दोन्ही मैच मध्ये हरवून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. भारताने नागपूर आणि दिल्ली मधील कसोटी फक्त तीन दिवसांमध्ये जिंकल्या आहेत. भारताने जर ऑस्ट्रेलियाला आणखी एका मालिकेमध्ये हरवले तर तो संघ आईसीसी वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशीप च्या फायनल मध्ये आपले स्थान पक्के केले असे होते.
तथापि, या मालिकेमध्ये आत्तापर्यंत कोहली ने मोठी धावसंख्या केलेली नाही. कोहली ने तीन मालिकेमध्ये ७६ धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्मा ने मालिकेच्या पहिल्याच डावामध्ये शतक करून जिंकवले होते. त्याने दोन्ही डावामध्ये जवळपास १८३ धावा केल्या आहेत आणि मालिकेमध्ये सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे.
View this post on Instagram