HomeCricketविराट कोहलीने मैदानावर बसून खेळला शॉट, श्रेयस अय्यरने एका हाताने पकडला कॅच,...

विराट कोहलीने मैदानावर बसून खेळला शॉट, श्रेयस अय्यरने एका हाताने पकडला कॅच, पाहा व्हिडिओ…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोर, मध्य प्रदेश येथे खेळवला जाणार आहे. हा सामना १ मार्चपासून सुरू होणार असून, त्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव सुरू केला आहे. एकीकडे भारतीय संघ गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव करत आहे, तर या सामन्यादरम्यान भारताचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून कॅच विशेष तयारी केली जात आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने या तयारीचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल झाला आहे.

वास्तविक या मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे पण स्लिपची फील्डिंग काही खास झालेली नाही. अशा परिस्थितीत संघाने याची खास प्रेक्टिस केली. संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इतर खेळाडूंनी यात भाग घेतला, ज्यामध्ये कोहली मुख्य भूमिकेत होता. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली जमिनीवर बसून शॉट खेळत आहे आणि मागे उभा असलेला श्रेयस अय्यर चेंडू कसा पकडत आहे, हे दिसत आहे.

यामध्ये कोहली मस्तीच्या मूडमध्ये पाहायला मिळत आहे आणि हसत-हसत पाठीमागे शॉट मारतो. जो अय्यर एका हाताने पकडतो. श्रेयस अय्यरने दिल्लीविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक महत्त्वाचा कॅच सोडला होता. त्यानंतर यासाठी खास प्रेक्टिस करण्यात आली.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts