भारतामध्ये अनेक लोकांना गणित आणि विज्ञानला घाबरत होते जेव्हा ते शाळेमध्ये शिकत होते. या लिस्टमध्ये भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचाही समावेश आहे. सध्या विराट कोहलीची मार्कशीट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. मार्कशीट पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल कारण गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये विराटला खूपच कमी मार्क मिळाले होते.
जगातील सर्वात महान खेळाडुंपैकी एक विराट कोहलीची १० वीची मार्कशीट लीक झाली आहे. विराटला तेव्हा गणितामध्ये खूपच कमी मार्क मिळाले होते. विराटने गुरुवारी आपली १० वी मधील मार्कशीटचा एक फोटो शेयर केला. सर्व विषयांमध्ये त्याला गणितामध्येच सर्वात कमी मार्क मिळाले होते. जर त्याने आणखी कमी लक्ष दिले असे तर तो कदाचित गणितामध्ये फेल देखील झाला असता.
विराट कोहली १० वीमध्ये विज्ञान आणि गणितामध्ये कमजोर होता. हे त्याची मार्कशीट सांगत आहे. नुकतेच बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत कसोटी शतकाचा दुष्काळ संपवणाऱ्या कोहलीला कोणत्याही विषयात शतक झळकावता आले नाही, म्हणजे १०० पैकी १०० गुण मिळवता आले नाहीत. त्याला इंग्रजीमध्ये सर्वात जास्त ८३ तर सोशल सायंसमध्ये ८१ मार्क मिळाले होते. गणितामध्ये त्याला सर्वात कमी ५१ तर सायंस अँड टेक्नॉलजीमध्ये ५५ मार्क मिळाले होते.
विराटने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि हे मजेदार आहे कि गोष्टी तुमच्या मार्कशीटमध्ये सर्वात कमी कशा जोडतात. तुमच्या चरित्रमध्ये सर्वात जास्त जोडतात. त्याने पुढे हॅशटॅगमध्ये लेट देयर बी स्पोर्ट म्हणजे यामध्ये स्पोर्ट्सची भावना देखील असायला हवी असे लिहिले आहे. विराटची हि पोस्ट अनेक लोकांनी ट्विटरवर देखील शेयर केली आहे आणि एडीट करून यामध्ये स्पोर्ट्स देखील जोडले आहे आणि विराटला १०० मार्क दिले आहेत.
Virat Kohli’s 10th class marksheet. pic.twitter.com/FNuCbUPsTB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2023