मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली झंकार यांनी दोन वर्षापूर्वी २१ एप्रिल २०२१ रोजी लग्न केले होते. ज्यानंतर त्यांना २०२३ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले होते. लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या सिरीयलच्या सेटवर दोघे एकत्र आले होते ज्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
View this post on Instagram
आता पिंकिंचा विजय असो मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर नुकताच एका मुलीचा बाबा झाला आहे. त्याच्या मुलीच्या बारशाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत जे त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले होते.
View this post on Instagram
अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली झंकार सध्या त्यांचे पॅरेंटहुड एन्जॉय करत आहेत. अभिनेत्याने ‘बाप झालो, लक्ष्मी घरी आली रे!’ असे म्हणत चाहत्यांना मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. विजयच्या मुलीला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. नुकताच त्याच्या लेकीचा नामकरण सोहळा पार पडला. दोघांनी आपल्या मुलीचे नाव मायरा ठेवले आहे.
View this post on Instagram
दोघांच्या लेकीचे बारसे मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. ज्याचे फोटो शेयर करत त्यांनी आपल्या लेकीचे नाव देखील जाहीर केले आहे. मायरा हे नाव सध्या मुलींच्या नावाच्या यादीमध्ये खूपच ट्रेडिंग असल्याचे पाहायला मिळत आहे. मायरा नावाचा अर्थ प्रिय, उदार, सक्षम, प्रशंसनीय असा होतो. अभिनेता सध्या पिंकीचा विजय असो मालिकेमध्ये काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर रुपालीने आपल्या लेकीला वेळ देण्यासाठी कामातून ब्रेक घेतला आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram