मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये नटस्रमाट म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांच्या वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईमधील राहत्या घरामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्धा, मत्सगंधा सारख्या प्रसिद्ध नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले होते.
अभिनेते मोहनदास सुखटणकर हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून बरीच वर्षे नाट्यसेवा केली. त्यांचं नाट्यसेवेमध्ये गोवा हिंदू असोसिएशनचे महत्वाचे स्थान आहे.
या संस्थेमध्ये त्यांनी अगोदर एक कलाकार म्हणून प्रवेश केला होता त्यानंतर ते कार्यकर्ता झाले. मोहनदास सुखटणकर यांनी आपल्या अभिनय करियरमध्ये ४०-५० नाटकांमध्ये काम केले. मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गी, स्पर्श, आभाळाचे रंग हि त्यांची काही गाजलेली नाटके आहेत.
त्याचबरोबर त्यांनी कैवारी, जावई माझा भला, चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, वाट पाहते पुनवेची, जन्मदाता, पोरका, प्रेमांकुर, निवडुंग सारख्या मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले. मोहनदास सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी झाला होता. त्यांचे वडील गोव्यामध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर होते.