मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खूपच चिंताजनक आहे. त्यांना पुण्यातील मंगेशकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा सर्व स्तरावर आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांपासून दर्शकां मनावर राज्य केले आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटाचे सर्वच स्तरामधून विशेष कौतुक झाले. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या अनुमती य चित्रपटामधील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. घश्यातील त्रासामुळे त्यांनी नाटकामधून सन्यास घेतला.
अभिनेते नवीन कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे देखील काम करतात. विक्रम गोखले यांचा फक्त अभिनयाची आवड नव्हती तर त्यांची आजी, पणजी देखील उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. तर विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी देखील ७० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे.
अभिनेते विक्रम गोखले यांनी संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनम (१९९९) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची भूमिका केली होती. त्यांनी भूल भुलैया, दिल से, दे दना दन, हिचकी, निकम्मा आणि मिशन मंगल सारख्या बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे.