HomeEntertainmentरितेश आणि जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाने दर्शकांना लावले ‘वेड’, बॉलीवूड चित्रपटाला मागे टाकत...

रितेश आणि जेनेलियाच्या ‘वेड’ चित्रपटाने दर्शकांना लावले ‘वेड’, बॉलीवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांत जमवला तब्बल इतक्या ‘करोड’चा गल्ला…

बॉलीवूडमधील दमदार अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट वेडने दर्शकांना अक्षरशः वेड लावले आहे. अभिनेत्री आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने या चित्रपटाने उत्कृष्ट काम केले आहे. प्रत्येकजण रितेशच्या वेडचे कौतुक करताना थकत नाही आहे.

वेड मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शन केले आहे ज्यामुळे सर्वजण हैराण आहेत. अशामध्ये आपण रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजाच्या वेड चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडमधील कमाईचे आकडे जाणून घेणार आहोत.

रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजाच्या पती-पत्नीच्या जोडीने वेड चित्रपटामधून दर्शकांचे मन जिंकले आहे. अनेक फिल्म क्रिटिक्स रितेश देशमुखच्या वेड या मराठी चित्रपटाला पॉजिटिव रिव्ह्यू दिले आहेत. त्याचबरोबर दर्शक देखील चित्रपटाचे खूप कौतुक करत आहेत. हेच कारण आहे वेड चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

प्रसिद्ध ट्रेंड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून वेड चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकडेवारीची माहिती शेयर केली आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी २ करोड २५ लाख रुपये, दुसऱ्या दिवशी ३ करोड २५ लाख रुपये, तिसऱ्या दिवशी ४ करोड ५० लाख रुपये तर सोमवारी चौथ्या दिवशी ३ करोड रुपये कमवले आहेत. आतापर्यंत चित्रपटाने १३ करोडचा गल्ला जमवला आहे.

३० डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाला दर्शकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रणवीर सिंहच्या सर्कस चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यामध्ये फक्त ७५ लाख रुपयांची कमाई केली. म्हणजेच रितेशच्या चित्रपटाने हिंदी चित्रपटाला मागे टाकत भरघोस कमाई केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts