‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात अखेर विवाह बंधनात अडकली आहे. नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्न केले आहे. अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्रीने लग्न केले आहे.
लग्नामध्ये वनिताने पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळा लुक ठेवला होता. तर गुलाबी रंगाच्या डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिताने आपला वधूचा लुक पूर्ण केला होता.
पारंपारिक दागिन्यांमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तर सुमितने शेरवानी घातली होती. सुमितने फेटा बांधल्यामुळे तो खूपच हँडसम दिसत होता. वनिता आणि सुमितच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
वनिता आणि सुमितच्या लग्नामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रामधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. वनिता आणि सुमितच्या हळदीचे फोटो देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर सेलेब्स आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वनिताचा नवरा हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरायची खूप आवड असल्यामुळे तो नेहमी आपले वी लॉग सोशल मिडियावर शेयर करत असतो. एका पिकनिकदरम्यान दोघांची भेट झाली होती. ज्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. ज्यानंतर त्यांनी लग्न क्र्नायचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram