भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर ऋषभ पंतचा सकाळी कार अपघात झाला आहे. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी सोशल मिडियावर प्रार्थना करत आहेत. दरम्यान बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलानेने नाव घेता ऋषभ पंतसाठी एक पोस्ट शेयर केली आहे.
शुक्रवारी बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक उर्वशी रौतेलाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून एक लेटेस्ट पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पण उर्वशी रौतेलाने या फोटोसोबत जे कॅप्शन लिहिले आहे ते सर्वात जास्त चर्चेमध्ये आहे.
वास्तविक उर्वशी रौतेलाने आपल्या या लेटेस्ट पोस्टला कॅप्शन देत प्रार्थना असे लिहिले आहे. अशामध्ये आता सोशल मिडियावर हा दावा केला जात आहे कि इशाऱ्या इशाऱ्यामध्ये उर्वशीने ऋषभ पंतच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे. उर्वशी रौतेलाच्या या लेटेस्ट फोटोवर अनेक सोशल मिडियावर युजर्स कमेंट्स करत आहेत.
टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतच्या अपघातादरम्यान उर्वशी रौतेलाचा हा लेटेस्ट आणि कॅप्शन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यादरम्यान अनेक लोकांनी सोशल मिडियावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका सोशल मिडिया युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे कि तुझ्या चक्करमध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि या पोस्टचा हेतू ऋषभ पंतच्या अपघातादरम्यान स्वतःला फेमस बनवणे आहे. अशाप्रकारे सध्या उर्वशीला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.
View this post on Instagram