मॉडल आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद नेहमी आपल्या अतरंगी फॅशनने लोकांना हैराण करते. असा एकही दिवस जात नाही जेव्हा उर्फी आपल्या आउटफिटमुळे चर्चेमध्ये राहत नाही. आतापर्यंत अभिनेत्री आपल्या आउटफिटमुळे खूपच चर्चेमध्ये राहिली आहे.
वास्तविक उर्फी जावेद सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. इथे ती आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. ज्यामध्ये कपड्यांशिवाय उर्फी, टेप, मोबाईल, चैन, घड्याळ आणि इतर अनेक वस्तूंनी ड्रेस बनवून ट्रोल होत असते. असे असून देखील चाहत उर्फीची एक झलक मिळवण्यासाठी खूपच आतुर असतात.
नुकतेच उर्फी जावेद मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाली. विशेष म्हणजे यावेळी ती चक्क साडीमध्ये पाहायला मिळाली. उर्फी जावेदची हि स्टाईल पाहून सोशल मिडिया युजर्स देखील हैराण झाले. अशा प्रकारे उर्फीने पुन्हा एकदा आपल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
उर्फी जावेद जसे मुंबई विमानतळावर दाखल झाली तसे तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पॅप्सनी एकच गर्दी केली. यादरम्यान उर्फीने देखील केसमध्ये हात फिरवत अनेक पोज दिल्या. उर्फीने एकापेक्षा एक पोज देत लोकांचे लक्ष आपल्याकडे वधून घेतले.
फोटो पाहू शकता कि उर्फी जावेदच्या साडीचा पदर पुन्हा पुन्हा खीसकत होता. यावर उर्फी जावेद तो सांभाळताना दिसत होती. तर सोशल मिडिया युजर्सने देखील भरभरून कमेंट्स केल्या. युजर्सने लिहिले कि साडीमध्ये पिन देखील लावली जाऊ शकते.
या फोटोंमध्ये उर्फीने पिंक आणि ऑरेंज मिक्स फ्लोरल साड़ी घातली आहे. तर साडीला मॅचिंग गुलाबी रंगाचे कानातले कॅरी केले आहेत. उर्फीने हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. उर्फी जावेदच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या अभिनेत्री एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या सीझन ४ मध्ये दिसत आहे.
View this post on Instagram