विचित्र फैशन करून ओळख बनवणारी उर्फी जावेद अलीकडे डेटिंग रियालिटी शो स्प्लीट्सवीला X४ मध्ये भाग घेणार आहे. शो मध्ये देखील उर्फी जावेद चा विचित्र फैशन पाहायला मिळत आहे. आतापर्यंत तर ती दुसऱ्या स्पर्धकांवर वरचढ होताना पाहायला मिळाले.शो मध्ये सनी लिओनि, उर्फी च्या कपड्यांबद्दल प्रशंसा करत आहे. यावेळी उर्फी ने आताचे फोटो शेअर केले ज्यामध्ये ती स्प्लीट्सवीला च्या दोन्ही एन्कर्स सनी आणि अर्जुन बिजलानी सोबत पोज देताना दिसत आहे.
सनी लिओनि तिच्या बोल्डनेस साठी ओळखली जाते परंतु उर्फी ने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ती सनी ला टक्कर देताना दिसत आहे. उर्फी ने निळ्या रंगाचा नेट चा ड्रेस घातला आहे. केसांचा तिने बन बनवला आहे. तसेच सनी देखील लाल रंगाच्या ड्रेस मध्ये सुंदर दिसत आहे.
अर्जुन बिजलानी ने पांढरा शर्ट वर बेज रंगाची पैंट घातली आहे आणि हाफ जैकेट घातला आहे. उर्फी ने कैप्शन मध्ये स्वतः ला खोडकर म्हंटले आहे. त्याआधी ती म्हणाली होती की माझ्या एंट्री ने शो मध्ये जिव आला आहे. आधी तो खूप कंटाळवाणा वाटत होता.
पोस्ट वर कमेंट करणाऱ्यांची देखील कमी नाही. एकाने लिहिले आहे, ‘कपडे घालून काय फायदा जर दाखवायचे आहे तर.’ एका युजर ने लिहिले की, ‘सनी लिओनि ने भारतात येऊन भारतीय संस्कृती चा स्वीकार केला परंतु उर्फी न्यूड होऊन कमावत आहे’. एकाने लिहिले आहे की, ‘मच्छरदानी च घालायची होती ना’. एकाने लिहिले की, ‘माझ्या खोलीमध्ये खूप मच्छर आहेत काय तू तुझा ड्रेस देऊ शकतेस काय’.
शनिवारी उर्फी जावेद ला मुंबई विमानतळावर पाहिले गेले. तिने फ्लोरल प्रिंट असणारी साडी घातली होती. उर्फी खूपच अवघड पणे साडी सांभाळताना दिसली आणि सारखा तिचा पदर घसरत होता. यामुळे पुन्हा एकदा तिला ट्रोल केले गेले.
View this post on Instagram