भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणार्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या दिवसाच्या पहिल्या तासामध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला पण नंतर ड्रिंक्स संपल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आणि एकामागून एक संपूर्ण टीमला ऑलआउट केले. भारतातर्फे उमेश यादवने स्पिनर्सला सपोर्ट करणाऱ्या पीचवर कांगारूंना आपल्या गोलंदाजीने अक्षरशः थकवले आणि अर्ध्या तासामध्ये तीन विकेट घेतल्या. ज्यामध्ये टॉड मर्फीची विकेट्स शानदार होती.
भारतीय टीमचा गोलंदाज उमेश यादवला जेव्हा देखील टीम कडून खेल्याची संधी मिळते तेव्हा तो आपल्या प्रदर्शनाने सर्वाना हैराण करतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये देखील असेच काही झाले. उमेशने पहिला ग्रीनची विकेट घेतली तर नंतर कर्णधाराला आऊट केले.
उमेश यादव इथेच थांबला नाही तर त्याने ७६ व्या ओवरमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करत विकेट घेतली. त्याने ओवरचे पहिले दोन चेंडू गुड लेंथवर टाकल्यानंतर तिसरा चेंडू अचानक यॉर्कर लेंथवर टाकला जो मर्फीला समजला नाही आणि तो चेंडू सरळ स्टंपमध्ये घुसला.
चेंडू इतका वेगवान होता कि स्टंप हवेमध्ये उडाली आणि खाली पडली. हा चेंडू प्रत्येकजण पाहतच राहिला. तर यासोबतच भारताला सातवी विकेट मिळाली. ज्यानंतर टीमने लवकरच तीन विकेट घेऊन डाव संपवला.
What. A. Delivery!@y_umesh was on 🔥 this morning, knocking down the off stump twice! 💪🏻
Watch #TeamIndia‘s reply LIVE in the 3rd MasterCard #INDvAUS Test on Star Sports & Disney+Hotstar! #BelieveInBlue #TestByFire #Cricket pic.twitter.com/JLsnp1UuRn
— Star Sports (@StarSportsIndia) March 2, 2023