प्रेम हे कोणत्याही जात धर्म आणि समुदाय उत्पन्न गट किंवा वयावर अवलंबून नसते. आजकाल लोक एकमेकांच्या वैवाहिक परिस्थितीवर देखील लक्ष देत नाहीत. अशाप्रकारची अनेक उदाहरणे दररोज पाहायला मिळतात. अशाचप्रकारचे एक प्रकरण बिहार मधून समोर आले आहे, जिथे दोन विवाहित महिला एकमेकांच्या पतीच्या प्रेमात पडल्या. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी लग्न देखील केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबात देखील फेरबदल झाले. सर्वात जास्त चकित करणारी गोष्ट हि आहे कि दोन्ही महिलांची नावे सारखीच आहेत.
हे संपूर्ण प्रकरण बिहारमधील खगडिया परिसरातील आहे, जिथे एक विचित्र प्रकारची प्रेम कथा पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात, तिथे राहणाऱ्या दोन महिलांना एकमेकींच्या पतीसोबत प्रेम झाले, ज्यानंतर त्यादोघींनी एकमेकांच्या पतीची अदलाबदल करून लग्न केले.
सर्वात चकित करणारी गोष्ट आहे कि दोन्ही महिलांचे नाव रुबी देवी आहे. हे प्रेम प्रकरण नीरज कुमार सिंह नावाच्या एक व्यक्तीपासून चालू होते. नीरज ने वर्ष २००९ मध्ये पसराहा गावातील रुबी देवी सोबत लग्न केले होते. या लग्नामधून त्यांना ४ मुले देखील झाली आहेत. अशातच ४ मुलांची आई बनलेली रुबी देवी ला तिच्याच गावातील राहणाऱ्या मुकेश कुमार सिंह नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम झाले. मुकेश चे घर रुबीच्या माहेरी च्या जवळचा आहे. योगायोगाने मुकेशच्या पत्नीचे नाव देखील रुबी देवी होते आणि त्यांना दोन मुले होती.
मागील वर्षी ६ फेब्रुवारी ला पहिल्यांदा रुबी देवी ने मुकेश सिंह सोबत पळूनजाऊन लग्न केले होते, त्यादरम्यान तिने तिच्या सोबत २ मुले आणि १ मुलगीला देखील सोबत घेऊन गेली. त्यानंतर नीरज तिची एक मुलगी आणि दुसरी रुबी देवी तिच्या दोन्ही मुलींच्या सोबत राहू लागले. अशातच एकदा अचानक नीरज ला दुसऱ्या रुबी देवी चा नंबर मिळाला, ज्यानंतर दोघांच्यात बोलणे चालू झाले, काही काळानंतर एकमेकांच्या सोबत प्रेम करू लागले आणि नंतर दोघांनी याच वर्षी १८ फेब्रुवारी ला कोर्ट मैरेज केले. हे प्रकरण समोर येताच प्रत्येकजण चकित झाले आहेत. तथापि चौघांनी एकमेकांच्या मुलांचा स्वीकार देखील केला आहे.