अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने नुकतेच आपला वाढदिवस साजरा केला आहे. १९७४ मध्ये जन्मलेली ट्विंकलने फिल्म इंडस्ट्रीचा पहिला सुपर स्टार राजेश खन्नाची मोठी मुलगी आहे. आज आपण ट्विंकलच्या लाईफमधील एका अश्या किस्स्याबद्दल जाणून घेणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील चकित व्हाल.
अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राची जोडी बॉलीवूडमधील सर्वात चर्चित जोडींपैकी एक होती. दोघांनी अंदाज़, ऐतराज़ आणि वक्त सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. माहितीनुसार २००३ मध्ये आलेल्या अंदाज चित्रपटाच्या शुटींग दरम्यान प्रियांका आणि अक्षयदरम्यान जवळीक वाढली होती.
संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या अफेयर चर्चा होत होत्या. असे म्हंटले जाते कि ट्विंकल पर्यंत देखील हि बातमी पोहोचली होती, ज्यानंतर ती खूपच अस्वस्थ झाली होती. यादरम्यान अशी बातमी देखील समोर आली होती कि द्विन्क्ल खन्नाने एक दिवस प्रियांका चोप्राला फोन करून अक्षयपासून दूर राहण्यात सांगितले होते.
तथापि ट्विंकल खन्नाच्या या गोष्टीवर प्रियांका चोप्राला काहीच फरक पडला नाही. ज्यानंतर ट्विंकलने असे पाऊल उचलले होते ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. माहितीनुसार ट्विंकल खांना एक दिवस चित्रपटाच्या शितिंग लोकेशनवर पोहोचली होती. असे म्हंटले जाते कि ती खूपच रागामध्ये ठोई आणि अभिनेत्री प्रियांकाला शोधत होती.
तथापि प्रियांका त्या दिवशी सेटवली आली नव्हती यादरम्यान अक्षय कुमारने त्याची पत्नी ट्विंकलला कसेतरी शांत केले आणि तेथून घरी पाठवले. असे म्हंटले जाते कि या घटनेनंतर अक्षय कुमार फक्त प्रियांकापासूनच दूर गेला नाही तर २००५ मध्ये रीली झालेल्या चित्रपटानंतर तो अभिनेत्रीसोबत पुन्हा कोणत्याच चित्रपटामध्ये दिसला नाही.