सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन जुळ्या बहिणी रिंकी आणि पिंकी एकाच तरुणाच्या प्रेमात पडल्या आहेत. आता या बहिणींनी तरूणासोबत लग्न केले आहे. कुटुंबियां त्याच्यासोबत लग्न करण्यास संमती दिल्यानंतर दोघी बहिणींनी त्याच्यासोबत लग्न केले.
आत या लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत कि हे लग्न कायदेशीर आहे की बेकायदेशीर? सध्या याची चौकशी सुरु आहे. दोघी बहिणी आईटी कंपनीमध्ये काम करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते ज्यानंतर त्या आपल्या आईसोबत राहत होत्या. आता जेव्हा दोघींनी अतुलसोबत लग्न केले आहे आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रिंकी आणि पिंकीच्या आईची प्रकृती बिघडली होती. ज्यानंतर दोघी बहिणींनी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्या साठी अतुलच्या गाडीचा वापर केला होता. अतुलने दोघी बहिणींना खूप मदत केली होती आणि त्यांच्या आईची देखील काळजी घेतली होती. त्यानंतर दोघी बहिणींपैकी एक बहिण अतुलच्या प्रेमात पडली. पण दोघी जुळ्या बहिणींची सवय एकच असल्यामुळे दोघींनी अतुलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघी बहिणींनाही काहीच आक्षेप नाही पण या लग्नानंतर भारतीय संस्कृतीला असा प्रकार योग्य ठरेल का, या चर्चेचा बाजारही रंगू लागला आहे. एकीकडे आपण बहुपत्नीत्वावर टीका करत असताना आणि त्याविरोधात कायदा आणण्याची वकिली करत असताना असे लग्न वैध ठरेल का?
दुसरीकडे, सोशल मीडियावर या लग्नाबाबत बहुतेक लोक हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत, परंतु हे लग्न काही गंभीर प्रश्न देखील उपस्थित करत आहे ज्यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मात्र, या प्रश्नाबाबत सुरू झालेल्या गदारोळातून आगामी काळात काय भूमिका घेतली जाणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
ये माया नगरी है, यहां कुछ भी संभव है. मुंबई में जुड़वा बहनों ने एक ही मंडप में की एक ही व्यक्ति से शादी. शादी का वीडियो इस समय सोशल मीडिया में धूम मचा रहा है. pic.twitter.com/YMjFyOQVZz
— सौरभ सिंह (@jsaurabhsingh) December 4, 2022