टीवी अभिनेत्री अनाया सोनी जवळपास दोन वर्ष डायलिसीस वर आहे. ‘मेरे साई’ मधील या अभिनेत्रीने जेव्हा पासून तिच्या मूत्रपिंड निकामी झाल्याची ची बातमी सोशल मिडीयावर टाकली आहे, तेव्हापासून तिच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. तिच्या या आजारपणामुळे अनेक कामे तिच्या हातून चालले आहेत. सतत डायलिसीस चा खर्च कामाचा ताण यामुळे ही अभिनेत्री खचत चालली आहे.
आजतक डॉट इन सोबत बोलताना अनाया सांगते की, मी आत्ताच दोन दिवसांपूर्वी ‘मेरे साई’ मालिकेचे शुटींग पूर्ण करून परतली आहे. डायलिसीस च्या कारणामुळे मी रेग्युलर काम करू शकत नाही. ज्या दिवशी डायलिसीस होते, त्यादिवशी सेट वर पोहोचणे अवघड जाते. प्रत्येक आठवड्यात तीन वेळा मला डायलिसीस ला जावे लागते. महिन्यात एकूण १२ दिवस माझे यामध्येच निघून जातात. हे तेव्हापर्यंत चालू राहणार, जेव्हा पर्यंत किडनी मिळत नाही. प्रत्येक सत्राला पंधराशे रुपये लागतात, त्याव्यतिरिक्त औषधांचा खर्च वेगळा करावा लागतो.
अनाया पुढे सांगते की, हा तर माझा फक्त औषधांचा खर्च आहे, वरती घराचे भाडे आणि असे अनेक खर्च होत चालले आहेत, अशातच वैद्यकीय स्थितीमुळे उत्पन्न देखील खूप कमी होत चालले आहे. आधी मी मालाड मध्ये रहात होते. तर भाड्याचे पैसे वाचवण्यासाठी मी आता घर देखील बदलले आहे. दवाखान्याच्या जवळ घर घेतले आहे. कारण की येण्याजाण्याचा खर्च कमी करता येईल. खूप कठीण दिवस जात आहेत. तेव्हापासून संघर्ष सुरु झाला आहे, जेव्हापासून मी सोशल मिडीयावर माझ्या दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात मला माझ्या उपचारासाठी निधी उभारायचा होता आणि उपचार घ्यायचे होते, परंतु ती पोस्ट माझ्यासाठी समस्या बनलेली आहे. आता जिथे ही ऑडिशन किंवा काम मागण्यासाठी जाते, तर माझ्या वैद्यकीय स्थितीमुळे मला नकार देण्यात येतो. मी तर आता जेव्हा डायलिसीस आहे, त्या दिवशी देखील काम करायला तयार आहे, प्रत्यक्षात, ते घाबरत आहेत की मला चित्रिकरणादरम्यान काही झाले तर. कोणीही धोका पत्करू शकत नाही. आता तर लहान मोठ्या भूमिका करून उदरनिर्वाह करत आहे.
पोस्ट च्या नंतर लोकांच्या विचित्र प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांनी तर मला फोन करून म्हणाले की अरे टू तर खूप सारे पैसे जमा करून बसली आहेस…तुझ्या जवळ तर खूप सारे पैसे आले असणार …माझ्या अवस्थेची चेष्टा केली जात आहे. माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही, परंतु काम ना मिळाल्यामुळे मी खचत चालली आहे. तथापि, या गोष्टीचा स्वीकार देखील केला पाहिजे की लोकांनी मदत देखील केली आहे. सोनू सूद, मेरे साई च्या सेट वरून देखील मला पैशांची मदत मिळाली आहे.
माझे मूत्रपिंड २०१५ मध्येच निकामी झाले होते, तेंव्हा वडिलांनी त्यांचे एक मूत्रपिंड मला दिले होते. मागील वर्षी कोविड मुळे ते मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यामुळे आता डायलिसीस वर आहे. माझ्या आई ला शुगर आहे. ती मूत्रपिंड दान करण्यास असमर्थ आहे. माझी आई अमरावती मध्ये माझ्या लहान भावासोबत रहाते. वडील आर्टिफ़िशिअल ज्वेलरी आणि कपडे भाड्याने देण्याचे काम करतात. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वडील इकडेच शिफ्ट झाले आहेत आणि आई तिथे व्यवसाय आणि भावाचा सांभाळ करत आहे.
मला लवकरात लवकर ठीक होऊन माझ्या कुटुंबाची मदत करायची आहे. आम्ही मूत्रपिंडा साठी अर्ज केला आहे. माझा टोकन नंबर १६७ होता, जो मागील महिन्यात १६४ झाला आहे. माहिती नाही माझा नंबर केव्हा येईल मी स्वतः चा कसा सांभाळ करत आहे, ते मला स्वतः ला माहिती आहे. कामासाठी सतत अर्ज करत आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी निराशा मिळत आहे. मला संपून जायचे नाही आणि नक्कीच हार मानू शकत नाही. मला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती, कारण मी माझ्या पैशातून माझ्या उपचाराचा खर्च करू शकेन.
View this post on Instagram