HomeBollywoodटीव्ही इंडस्ट्री हा'दर'ली ! प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’धन, वयाच्या ४६ व्या...

टीव्ही इंडस्ट्री हा’दर’ली ! प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’धन, वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुखद बातमी समोर आली आहे. कुसुम फेम अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचे निधन झाले आहे. सिद्धांत अवघ्या ४६ वर्षाचा होता. असे म्हंटले जात आहे कि जिममध्ये वर्कआउट करताना तो अचानक खाली पडला. त्याला त्वरित हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीमधील हि तिसरी घातली आहे. जेव्हा अचानक एका अभिनेत्याचे निधन झाले आहे. याआधी राजू श्रीवास्तवला जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता तर दिपेश भान क्रिकेट खेळताना अचानक खाली पडला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता.

धक्कादायक ! डाएट बदलल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे निधन, अनेक दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर ४३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

अभिनेता जय भानुशालीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिद्धांतच्या मृत्यूवर दुख व्यक्त केले आहे. त्याने सिद्धांतचा एक फोटो शेयर करत लिहिले आहे कि खूपच लवकर निघून गेलास. जयला त्याच्या कॉमन मित्राकडून माहिती झाले कि तो जिममध्ये बेशुद्ध झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

सिद्धांतने आपल्या करियरची सुरुवात मॉडलिंग पासून केली होती. त्याला आनंद सूर्यवंशी नावाने ओळखले जात होते. सिद्धांतने कुसुम सिरीयलमधून डेब्यू केला होता. याशिवाय तो अनेक टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसला आहे. सिद्धांतच्या मुख्य सिरीयलमध्ये कसौटी जिंदगी की, कृष्णा अर्जुन, क्या दिल में है सहित अनेक सिरियल्स आहेत. तो क्यूं रिश्तों में कट्टी बट्टी आणि जिद्दी दिलमध्ये शेवटचा दिसला होता.

सिद्धांतच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबात पत्नी अलेसिया राउत आणि दोन मुले आहेत. त्याची पत्नी अलेसिया सुपरमॉडल आहे. दोघे २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. हे त्यांचे दुसरे लग्न होते. २०१५ मध्ये त्याने इरासोबत पहिले लग्न केले होते. सिद्धांत आणि इराला एक मुलगा देखील आहे. दुसरीकडे अलेसियाला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts