HomeBollywoodमोठ्या बजेटचे चित्रपट करुणही ‘या’ अभिनेत्रीला मिळाली नाही ओळख, त्यानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी...

मोठ्या बजेटचे चित्रपट करुणही ‘या’ अभिनेत्रीला मिळाली नाही ओळख, त्यानंतर प्रसिद्धी मिळवण्यासाठी पाच अभिनेत्यांसोबतच….

यशराज बॅनरखाली बॉलीवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री ट्यूलिप जोशी आज आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. ट्यूलिपने हिंदीच नाही तर पंजाबी, तमिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ११ सप्टेंबर १९७९ रोजी अभिनेत्रीचा जन्म गुजराती कुटुंबामध्ये झाला होता. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

ट्यूलिप जोशीने जमनाबाई नर्सी स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मेजरिंग फूड साइंस अँड केमिस्ट्रीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर २००० मध्ये मिस इंडियामध्ये भाग घेतला. तथापि यामध्ये तिला सफलता मिळाली नाही. पण तिच्या नशिबाला काही वेगळेच मंजूर होते आणि मित्राच्या लग्नामध्ये तिच्या हातामध्ये एक मोठी संधी आली.

एकदा ट्यूलिप जोशी तिच्या एका मित्राच्या लग्नामध्ये गेली होती. तिथे तिला आदित्य चोप्राने पाहिले आणि लगेच तिला मेरे यार की शादी ही चित्रपट ऑफर केला. यानंतर ती ऑडिशन देण्यासाठी गेली आणि सिलेक्ट झाली. यशराज बॅनरखाली बॉलीवूडमध्ये एंट्री करून देखील तिची सुरुवात चांगली राहिली नाही.

यानंतर ती दिल मांगे मोर चित्रपटामध्ये दिसली जो चित्रपट फ्लॉप झाला. ट्यूलिपने यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण बॉलीवूडमध्ये ती फार काही सफल झाली नाही आणि चित्रपटांपासून दूर गेली. ती जय हो चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती ज्यामध्ये तिने कॅमिओ रोल केला होता.

ट्यूलिप जोशी चित्रपटांमध्ये काम करताना कॅप्टन विनोद नायर यांना भेटली. विनोद नायर १९८९ पासून १९९५ पर्यंत इंडियन आर्मीमध्ये राहिले. दोघांमध्ये आधी चांगली मैत्री झाली आणि अंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. दोघांनी चार वर्षे लिव इनमध्ये राहिल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

विनोद पॉपुलर नॉवेल ‘प्राइड ऑफ लॉयन्सचे लेखक आणि एक सक्सेसफुल बिजनेसमॅन आहेत. माहितीनुसार २००७ मध्ये विनोदने ट्रेनिंग आणि मॅनेजमेंट कंसल्टिंग फर्म सुरु केली होती. लग्नानंतर ट्यूलिप पतीसोबत मिळून करोडो रुपयांची कंपनी सांभाळत आहे. या कंपनीची ट्यूलिप संचालक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts