HomeEntertainmentमनोरंजनसृष्टी हादरली ! ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघाती निधन...

मनोरंजनसृष्टी हादरली ! ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपघाती निधन…

झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला सिरीयलमध्ये अल्पावधीमध्येच दर्शनच्या मनावर छाप सोडली. सिरीयलवर मधील सर्व कलाकारांनी दर्शकांच्या मनामध्ये घर निर्माण केले. अशामध्ये आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिरीयलमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचे अपघाती निधन झाले आहे.

तुझ्यात जीव रंगला मधील प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचे अपघाती निधन झाले आहे. अभिनेत्री या सिरीयलसोबत इतर अनेक सिरियल्समधून काम करून लोकप्रियता मिळवली होती. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने प्रेमाची भाकरी नावाने कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी सांगली फाटा येथे आपले हॉटेल सुरु केले होते.

निवारी रात्री हॉटेल बंद करून घरी जात असताना डंपरने धडक दिल्यामुळे अभिनेत्रीचे निधन झाले. कल्याणी जाधव हि मुळची कोल्हापूरची असून ती महावीर कोलेज परिसरामध्ये वास्तव्यास होती.

अभिनेत्रीने आठवडाभरापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता. या निमित्ताने तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली होती. काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या..

कल्याणी तुज्यात जीव रंगला सिरीयलमुळे घराघरामध्ये लोकप्रिय झाली होती. अभिनेत्रीने सिरीयलमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. शिवाय तिने सन मराठी वाहिनीवरील दख्खनचा राजा ज्योतिबा या सिरीयलमध्ये देखील काम केले होते. या सिरीयलमधील तिची भूमिका खूपच गाजली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts