HomeEntertainmentसाऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून आणखी एक धक्कादायक बातमी ! ‘या’ सुपरस्टारची तब्येत बिघडली,...

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून आणखी एक धक्कादायक बातमी ! ‘या’ सुपरस्टारची तब्येत बिघडली, ४ दिवसांनंतर होणार आहे लग्न…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता नागा शौर्याची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली आहे. असे म्हंटले जात आहे कि शुटींगदरम्यान अचानक अभिनेत्याची तब्येत बिघडली आणि तो सेटवरच बेशुद्ध पडला. घाईघाईने त्याला जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. नागा शौर्यचे लग्न चार दिवसांनंतर आहे आणि याआधीच त्याची तब्येत अचानक बिघडली आहे. ज्यामुळे चाहते आणि कुटुंबीय चिंतेमध्ये आहेत.

टॉलीवुड स्टार नागा शौर्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तो सेटवरच बेशुद्ध पडला. त्याला हैदराबादच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांना समजले कि अभिनेत्याला हाय ग्रेड फीवर आहे. सध्या त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात आहे.

असे देखील म्हंटले जात आहे कि लग्नाच्या अगोदर अभिनेता वाटर डायइट फॉलो करत होता. तो लिक्विड डायइट घेत नव्हता आणि यामुळे त्याच्या शरीरामध्ये पाण्याची कमी झाली होती आणि तो बेशुद्ध झाला. डॉक्टरांनी सांगितले कि नागा शौर्याची तब्येत आता सामान्य आहे आणि चिंतेचे काही कारण नाही. लवकरच त्याला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल.

टॉलीवुड स्टार नागा शौर्या गर्लफ्रेंड अनुषा शेट्टीसोबत २० नोव्हेंबर २०२२ रोजी लग्न करणार आहे. नुकतेच त्याच्या लग्नाचे कार्ड देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. नागा शौर्या एक अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो दिग्दर्शक आणि रायटर देखील आहे. तो तेलगु चित्रपटांमध्ये काम करतो, २०११ मध्ये त्याने क्रिकेट, गर्ल्स अँड बिअर या चित्रपटामधून डेब्यू केला होता. यानंतर तो चंदामामा कथालू या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Naga Shaurya (@actorshaurya)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts