HomeBollywoodरिलेशनशिपबद्दल 'या' अभिनेत्रीने शेयर केल्या आपल्या कटू वेदना, म्हणाली; बॉयफ्रेंड मला खुलेआमच...

रिलेशनशिपबद्दल ‘या’ अभिनेत्रीने शेयर केल्या आपल्या कटू वेदना, म्हणाली; बॉयफ्रेंड मला खुलेआमच…

भारतात दररोज खूप साऱ्या महिला घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. त्यातील काही महिला त्यासाठी लढा देतात आणि एकटे जीवन जगण्याचा निर्णय घेतात. या हिंसाचाराला फक्त सामान्य घरातील स्त्रियाच बळी पडत नाहीत तर मॉडेल आणि अभिनेत्री देखील पडतात. खूप साऱ्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले दुखः बाहेर पडू दिले नाही. तसेच काहींनी या अपमानास्पद संबंधाबद्दल मोकळे पणाने बोलल्या आणि महिलांच्या साठी एक आदर्श निर्माण केला. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक टीना दत्ता देखील आहे. जवळपास दोन वर्ष आधी टीना ने तिच्या वाईट संबंधाबद्दल वाच्यता केली होती.

खूप वेळा नंतर टीना दत्ता ने बिग बॉस १६ मध्ये येण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तिला पडद्यावर एका संस्कारी सूनेच्या भूमिकेत पाहिले गेले होते. परंतु बिग बॉस मध्ये तिचे काही वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. बिग बॉस मध्ये तिला पाहिल्या नंतर तो काळ आठवला, जेव्हा तिने तिची दुखद कथा सांगितली होती. २०१९ मध्ये टीना दत्ता ने अपमानास्पद संबंधाबद्दल जगासमोर सांगितले. टीना दत्ता ने सांगितले की तिने २०१५ मध्ये त्याच्या सोबत संबंध तोडले आहेत.

एक्स बॉयफ्रेंड ला ती एका मित्राच्या ओळखीने भेटली होती. या संबंधामध्ये तिला आनंदाव्यतिरिक्त फक्त दुखः मिळाले. बॉम्बे टाइम्स ला दिलेल्या एका मुलाखतीत टीना दत्ता ने सांगितले की, तिचा बॉयफ्रेंड तिला त्रास देत होता. तो इतका कठोर व्यक्ती होता की टीना दत्ता वर हात उचलण्याआधी एकदा विचार देखील करत नव्हता. टीना दत्ता खूप वेळ तिच्या संबंधांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ती शांत बसत होती. पण जेव्हा गोष्टी हाता बाहेर जावू लागल्या, तेंव्हा तिने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

टीना दत्ता च्या या निर्णयाने सर्वांना चकित केले होते. परंतु खूप साऱ्या महिलांना यातून प्रेरणा देखील मिळाली. टीना दत्ता च्या गोष्टी वरून हे शिकायला मिळते की ज्या नात्यात आदर नाही त्या संबंधामध्ये नसलेले चांगले. तसेच टीना दत्ता च्या हिमतीची दाद द्यायला हवी, कारण तिने एवढी मोठी गोष्ट सर्वांसमोर सांगितली.

टीना दत्ता ने ५ वर्षांची असल्या पासून टीवी मालिकांमध्ये सुरुवात केली. लहान वयात तिने सिस्टर निवेदिता शो मधून टीवी मालिकांमध्ये सुरुवात केली. टीवी मालिका सोडून तिने बंगाली चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. परंतु खरी ओळख तिला ‘उतरण’ मालिकेमध्ये ‘इच्छा’ च्या भूमिकेतून मिळाली. या मालिकेमध्ये तिने रश्मी देसाई सोबत प्रमुख भूमिका केली होती. बिग बॉस मध्ये येण्या आधी टीना दत्ता खतरो के खिलाडी ७ मध्ये दिसली होती. हा टीना दत्ता चा दुसरा मोठा शो होता. पाहूया जिंकून बाहेर येते की नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts