टिक टॉक माध्यमातून लाखो दर्शकांना हसवणारा टिक टॉक स्टार संतोष मुंडेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोषसोबत आणखी एका तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. हि घटना बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी परीसरामध्ये घडली.
घटनेमुळे सध्या सर्व स्तरामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. बीडचा संतोष मुंडेने टिकटॉक आणि रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीमध्येच प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या विनोदी शैलीमुळे संतोषला सोशल मिडियावर लाखो लोक फॉलो करत होते. संतोष मुंडेसोबत आणखी एका तरुणाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. बायको लय मारती, बायकोने टीकटॉक स्टारला शेळी सांभाळायला लावली… म्हणत सर्वांना हसवणारा, ग्रामीण व अस्सल मराठमोळ्या बोली भाषेमधून आपल्या विनोदांनी लोकांना हसवणारा संतोष आज चाहत्यांना रडवून गेला.
संतोष मुंडे हा फेमस टीकटॉक स्टार असून त्याच्या निधनाची बातमी कळताच अनेक स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबत त्याचा मित्र बाबुरावचे देखील जागीच निधन झाले आहे. संतोष त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जात होता.
अस्सल ग्रामीण शैलीमधील तो लोकांचे मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो टिक टॉकवर व्हिडीओ शेयर करत होता. संतोषने वेब सिरीजमध्ये देखील आपले नशीब आजमावले होते. आपल्या बोबड्या बोलीमध्ये त्याचे विनोद दर्शकांना खूपच आवडत असत.
संतोषचे निधन झाले आहे याचा अजूनदेखील त्याच्या चाहत्यांवर विश्वास बसत नाही आहे. भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी संतोष आणि त्याचा मित्र दोघेजण केले होते यादरम्यान अचानक त्यांना विजेचा शॉक लागल्यामुले त्यांचा मृत्यू झाला. हि माहिती समजताच समाज माध्यमातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.