तुम्हालाही तुमच्या आवडत्या स्टार्स बद्दल काही जाणून घ्यायला आवडेल, विशेषतः त्यांच्या लहानपणाबद्दल. तुमचे आवडते स्टार्स लहानपणी कसे दिसत होते. हे जाणून घेण्याची आतुरता प्रत्येकालाच असते. आज आम्ही तुमच्यासाठी ९० च्या दशकातील एक अशी सुपरस्टार अभिनेत्री जिच्या लहानपणीचे फोटो घेऊन आलो आहोत ज्यांचे लाखो करोडो चाहते आहेत.
हिट नंतर हिट देणारी आणि कॉमेडी तसेच गंभीर भूमिकांना जीवदान देणारी हि अभिनेत्री बॉलीवूडच्या प्रसिद्ध कपूर घराण्यातील आहे. कपूर घराण्यातील येणारी ती पहिली मुलगी होती, जिने बॉलीवूड मध्ये पाउल ठेवले होते. हो, तुम्ही बरोबर समजत आहात, फोटो मध्ये दिसणारी मुलगी करिष्मा कपूर आहे.
फोटोमध्ये दोन वेण्यांमध्ये बांधलेली करिष्मा तिची आई बबिता सोबत दिसत आहे. बेबी कट हेअरस्टाईल मध्ये करिष्माचा चेहरा खूपच निरागस दिसत आहे. तिचे हसू तेव्हाही तितकेच सुंदर होते जेवढे आजही आहे. करिष्मा ची आई बबिता देखील तिच्या वेळची एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.
करिष्मा कपूर ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री होती. तिने जिगर(१९९२), अनाडी(१९९३), राजा बाबू, सुहाग(१९९४), गोपी किशन(१९९४), कुली नं १(१९९५), जुडवा, साजन चले ससुराल आणि जीत सारख्या एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट केले आहेत.
२५ जून १९७४ ला जन्मलेली करिष्मा कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे जिने बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच्या अगोदर राज कपूर पासून ते ऋषी कपूर पर्यंत या कुटुंबातील फक्त पुरुषच चित्रपटांमध्ये काम करत होते.
करिष्मा नंतर तिची लहान बहिण करीना कपूर ने देखील बॉलीवूड मध्ये सुरुवात केली आणि ती देखील बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील आहे. करीना आणि करिष्मा यांची बॉंन्डींग खूप चांगली आहे. दोघी बहिणी सर्व कार्यक्रमामध्ये सोबत दिसतात. या फोटो मध्ये दोघांच्या मधील बॉन्डींग पाहिली जाऊ शकते.
View this post on Instagram