बॉलीवूडमध्ये सुंदर आणि हुशार अभिनेत्रींची कमी नाही. हिंदी पिक्चर मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या आपल्या मेहनतीच्या आणि चांगल्या अभिनयाच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर आहेत. परंतु या क्षेत्रात असे नाही आहे फक्त सुंदरता आणि अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण होते. हिंदी पिक्चर मध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना या क्षेत्रात टिकण्यासाठी खूप परीस्थितीचा सामना करावा लागतो, ज्याच्या विषयी आपण कधी विचारही केला नसेल. हा होय, त्यांना खूप वेळा करिअरमध्ये कास्टिंग काऊचला बळी पडावे लागते. कास्टिंग काऊच फिल्म इंडस्ट्रीचे घृणास्पद सत्य आहे.
राधिका आपटे: राधिका आपटेला साल २०१८ मध्ये अक्षय कुमारची सुपरहिट फिल्म पैडमैन मध्ये बघायला मिळाले. राधिका आपटेने स्वतः कबूल केले आहे की दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्री मध्ये कास्टिंग काऊच शिकार झाली होती. अभिनेत्रीने आपला अनुभव सांगितला की एका अभिनेत्याने त्यांना बॉलीवूडमध्ये एक फिल्म ऑफर केली होती परंतु त्यासाठी तिला तडजोड करावी लागणार असे सांगण्यात आले.
सुरवीन चावला: टीवी पासून बॉलीवूड पर्यंतचा प्रवास केलेली अभिनेत्री सुरवीन चावला हिंदी चित्रपटातील सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे. सुरवीन चावलाला सुद्धा साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता परंतु सुरवीनच्या म्हणण्यानुसार तडजोड करण्यास तिने साफ नकार दिला होता तथापि सुरवीन चावलाने या गोष्टीला नकार दिला की बॉलीवूडमध्ये तिला अशाप्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागला नाही.
एली अवराम: बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री एली अवराम पण कास्टिंग काऊचची शिकार झाली होती. एली अवरामला करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात निर्मात्यांनी सोबत झो-प-ण्या-चा इशारा केला होता. एलीच्या म्हणण्यानुसार, बॉडी शेमिंग चा सुद्धा सामना करावा लागला होता. ती लहान होती, ज्यामुळे तिला सांगितलं जायचं की तू अभिनेत्री नाही बनू शकत. एवढच नाही तर तिला वजन कमी करण्यास सुद्धा सांगण्यात आले होते.
टिस्का चोपडा: टिस्का चोपडा खूप साऱ्या प्रसिद्ध टीव्ही शो व वेब सिरीज मध्ये काम केले आहे. ती आत्ताच्या प्रसिद्ध अश्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल आहे. टिस्का चोपडा तारे जमीन पर मध्ये ईशान च्या आई च्या भूमिकेमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. टिस्का यांनी सर्वांसमोर या गोष्टींचा स्वीकार केला आहे की आपल्या करिअर च्या सुरवातीला एका पिक्चर मध्ये काम करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.