HomeBollywoodया सेलेब्सच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्टनरवरच उठवले होते प्रश्न, एकाला तर सासरच्यांम्हंटले होते...

या सेलेब्सच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्टनरवरच उठवले होते प्रश्न, एकाला तर सासरच्यांम्हंटले होते पांढऱ्या पायाची…

चित्रपट इंडस्ट्री मध्ये खूप सारे असे कलाकार आहेत, ज्यांचा मृत्यू रहस्यमय रित्या झाला आहे. या कलाकारांच्या निधनानंतर एकीकडे लोकांना मोठा झटका बसला आणि दुसरीकडे त्यांच्या जोडीदाराला लोकांचे टोमणे ऐकावे लागले होते. फक्त एवढेच नाही तर या सेलिब्रिटिंच्या मृत्यू नंतर लोकांच्या संशयाची सुई त्यांच्या जोडीदारावर येत होती. बॉलीवूड लाइफ च्या या रिपोर्ट मध्ये बघूया कोणा कोणाचे नाव आहे.

रेखा: रेखा ने १९९० मध्ये मुकेश अग्रवाल सोबत एका मंदिरात लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यानंतर मुकेश ने आत्महत्या केली होती. मुकेश च्या मृत्यू नंतर सासरच्या लोकांनी रेखा ला खूप टोमणे मारले होते, एवढेच नाही तर सासू ने रेखा ला ‘डायन’ देखील म्हणाली होती.

रिया चक्रवर्ती: अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने १४ जून २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्यादरम्यान रिया वर सुशांत ला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावला होता. या घटनेनंतर सुशांत च्या कुटुंबीयांनी रिया विरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

महेश भट्ट: २००५ मध्ये अभिनेत्री परवीन बाबी तिच्याच घरात गूढ रित्या मृतावस्थेत आढळली होती. परवीन बाबी च्या मृत्यू नंतर लोकांची नजर महेश भट्ट वर पडली होती. कारण एक वेळ होती तेंव्हा महेश परवीन बाबी च्या खूप जवळ असायचे आणि ते दोघे लिव इन रेलिशन मध्ये रहात होते.

साजिद नाडीयाडवाला: १९९२ मध्ये साजिद नाडीयाडवाला ने त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिव्या भारती सोबत लग्न केले होते. परंतु लग्नाच्या ११ महिन्यानंतर दिव्या चा रहस्यमय रित्या मृत्यू झाला होता, ज्यानंतर लोकांचा संशय साजिद वर होता.

सुरज पांचोली: अभिनेत्री जिया खान ने वर्ष २०१३ मध्ये आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या निधनानंतर आदित्य पांचोली चा मुलगा सुरज वर जिया ला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. त्यामुळे सुरज ला जवळपास एक महिना कारागृहात राहावे लागले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts