HomeEntertainmentसाऊथ सिनेसृष्टी पुन्हा हादरली ! ७५० चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याचे निधन,...

साऊथ सिनेसृष्टी पुन्हा हादरली ! ७५० चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

टॉलीवुड मधील दिग्गज अभिनेता कैकला सत्यनारायण चे शुक्रवारी तडके फिल्मसिटी स्तिथ त्यांच्या घरामध्ये निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते आणि मागील काही दिवसांपासून जुन्या व्याधीने ग्रासले होते. २५ जुलै १९३५ ला आंध्रप्रदेश च्या कृष्णा जिल्ह्यात जन्मलेल्या सत्यनारायण यांनी १९५९ मध्ये तेलुगु चित्रपट ‘सिपाई कुथूरु’ मधून सुरुवात केली होती.

सत्यनारायण ने ६ दशकांच्या कारकीर्दीमध्ये जवळपास ८०० चित्रपटानंमध्ये अभिनय केला आहे. तथापि त्यांना खलनायकाच्या भूमिकेतून जास्त प्रसिद्धी मिळाली. परंतु त्यांना पौराणिक चरित्रावर, विशेष करून मृत्यू चा हिंदू देव भगवान यम यांच्या भूमिकेत पाहिले गेले आहे.

एनटी रामा राव, नागेश्वर राव, कृष्णा पासून चिरंजीवी, नागार्जुन, व्यंकटेश, बालकृष्ण, आणि प्रभास, अल्लू अर्जुन च्या सोबत सत्यनारायण ने टॉलीवुड मधील चित्रपट ताऱ्यांच्या अनेक पिढ्यांसोबत काम केले आहे. अभिनेत्याने शेवटचे २०१९ मध्ये महेश बाबू स्टार ‘महर्षी’ मध्ये दिसले होते. टॉलीवुड मधील प्रसिद्ध कलाकार आणि दोन्ही तेलुगु राज्यातील अनेक मोठ्या व्यक्तींनी सत्यनारायण यांच्या निधनावर दुखः व्यक्त केले आहे.

चिरंजीवी ने तेलुगु मध्ये एक नोट शेअर करत लिहिले कि “कैकला सत्यनारायण यांच्या आत्म्याला शांती मिळो “. चिरंजीवी जुलै मध्ये कैकला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी देखील गेले होते. ते त्यांच्या केक कापण्याच्या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी झाले होते. त्यांनी ट्विटर वर वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर करत त्यांच्याशी संबंधित अनुभव शेअर केले होते.

चिरंजीवी ने लिहिले कि “कैकला सत्यनारायण गारू सोबत भेट घेतली. काही जुन्या गोष्टीची आठवण काढणे खूपच आनंदाची बातमी होती. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वशक्तिमान कैकला सत्यनारायण गारू यांना पुढील अनेक वर्ष कुटुंब आणि मित्रांच्या सोबत चांगले स्वास्थ्य आणि आनंद मिळो”. कैकला सत्यनारायण ने १९९६ मध्ये मछलीपट्टनम मधून लोकसभा निवडणूक लढवली होती. कुटुंबातील सदस्यांकडून सांगण्यात आले कि, सत्यनारायण यांच्यावर अंत्यसंस्कार शनिवारी केले जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts