मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने एका मुलाखतीदरम्यान एक खुलासा केला आहे ज्याला ऐकून सगळे चकित झाले आहेत. तेजस्विनी ने सागितले कि जेव्हा ती पुण्यामध्ये रहात होती तेव्हा तिच्या सोबत एक घटना घडली होती. तिने सांगितले कि ती ज्या घरामध्ये रहात होती तिथल्या घरमालकाने त्यांना खूपच वाईट वागणूक दिली होती.
अपार्टमेंट चा मालक एक नगरसेवक होता, ज्याने घरभाड्याच्या बदल्यात से क्शुअ ल फेवर बद्दल बोलत होता. हे प्रकरण २००९-१० चे आहे. तेजस्विनी त्यावेळी पुण्यामध्ये सिंहगड रोड वर भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंट मध्ये रहात होती आणि कामासाठी संघर्ष करणारी अबिनेत्री होती. तेजस्विनी चे फक्त १ – २ चित्रपटच प्रदर्शित झाले होते.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सांगितले कि ती खूप वाईट वेळ होती. तिने पुढे सांगितले-‘जेव्हा मी भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिस मध्ये गेले तर त्याने स्पष्टपणे मला हि ऑफर दिली. मला भाड्याच्या बदल्यात से क्शुअ ल फेवर मागितले. मला काही समजले नाही आणि मी तिथे टेबल वर ठेवलेला पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर फेकून मारला होता’. मी त्याला म्हणाले- ‘हे सगळे करण्यासाठी मी या व्यवसायात प्रवेश केलेला नाही. अन्यथा मी या अपार्टमेंट मध्ये राहिलेच नसते.
तेजस्विनी ने सांगितले कि माझ्या सोबत हे घडले कारण मी त्यावेळी मी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. त्याव्यतिरिक्त माझ्या कामामुळे ते माझ्या बद्दल असा विचार केला असेल. हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा शिकण्यासारखा अनुभव होता. तेजस्विनी ने या खुलाश्यानंतर चाहते तिच्या धैर्याची आणि धाडसाला दाद देत आहेत. चाहते तिला अशाच प्रकारे ताकतवर आणि खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत.
तेजस्विनी पंडित एक मराठी अभिनेत्री आहे. तिने चित्रपटामध्ये सुरुवात ‘अगं बाई अरेच्या’ चित्रपटामधून केली होती. चित्रपटामध्ये तेजस्विनी ची खल्नायकाची भूमिका होती. चित्रपटांच्या व्यतिरिक्त तेजस्विनी ने टीवी इंडस्ट्री मध्ये देखील काम केले आहे. सोशल मिडीयावर तिचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. या खुलाशानंतर तेजस्विनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.