HomeBollywoodव्वा! ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रभाससोबत झळकणार ‘हि’ मराठमोळी अभिनेत्री, पोस्ट करत म्हणाली...

व्वा! ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये प्रभाससोबत झळकणार ‘हि’ मराठमोळी अभिनेत्री, पोस्ट करत म्हणाली…

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसाठी नुकतेच एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहत असते. रानबझार या वेब सिरीजमुळे तर ती चांगलीच चर्चेमध्ये राहिली होती.

वेब सिरीजमधील बोल्ड सीनमुले तिला टिकेचा देखील सामना करावा लागला होता. पण तिने सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सची बोलतीच बंद केली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेमध्ये आली आहे. पण यावेळच कारण खूपच खास आहे. अभिनेत्री आता प्रभाससोबत आदिपुरुष चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

यासंदर्भात तिने एक पोस्ट शेयर करून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे ज्यामध्ये तिने म्हंटले आहे कि, आरंभ… २ ऑक्टोबरला आमच्यासोबत टीझर बघण्यासाठी तयार राहा.

याचा अर्थ असा होतो कि ती या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तिच्या पोस्टवर सध्या चाहते कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. तिला भव्य चित्रपटामध्ये पाहण्यासाठी चाहते आता आतुर झाले आहेत. प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. नुकतेच या चित्रपटामधील प्रभास लुक समोर आला आहे. आता हा चित्रपटा कधी रिलीज होतो यावर दर्शकांचे लक्ष लागून राहिले आहे. बाहुबली नंतर प्रभासचा हा दुसरा भव्य चित्रपट आहे.

चित्रपटामध्ये प्रभास मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. २ ऑक्टोबर म्हणजेच आज या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटामध्ये दिग्दर्शन केले आहे. आता अभिनेत्री चित्रपटामध्ये कोणत्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणारा आहे हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts