संपूर्ण देशामध्ये सध्या होळीचे वातावरण आहे. रंगाचा हा सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. होळीचा सण टीम इंडियाने देखील धुमधडाक्यात साजरा केला. वुमन प्रीमियर लीगमध्ये भारतीय खेळाडूंनी विदेशी खेळाडूंसोबत हा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला. आता टीम इंडियाच्या खेळाडूंनी चौथ्या कसोटीपूर्वी होळीचा सण उत्साहात साजरा केला.
भारतीय टीमचा स्टार ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील अनेक स्टार क्रिकेटर्स होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. व्हिडीओ टीम इंडियाच्या बस मधला आहे. व्हिडीओ मध्ये भारतीय संघातील खेळाडू रंग बरसे गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
गिलच्या व्हिडीओमध्ये विराट कोहली गाणे म्हणताना देखील दिसत आहे. तर भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा, विराट आणि शुभमन गिलवर मागून गुलाल उडवत आहे. याशिवाय या व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यरला देखील पाहू शकता. गिल शिवाय रोहितने देखील सोशल मिडियावर दोन फोटो शेयर केले आहेत. यामध्ये मोहम्मद सिराज, चेतेश्वर पुजारा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना पाहू शकता.
View this post on Instagram
सिरीजमधील तीन सामने तिसऱ्या दिवशीच संपले. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. तर दिल्लीमध्ये खेळलेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने ६ विकेट विजय मिळवला. यानंतर इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाने ९ विकेटने बाजी मारली. इंदोरच्या पीचवर स्पिनर्सला खूप जास्त मदत मिळाली होती ज्यानंतर आईसीसीने त्याला खराब रेटिंग दिली.
View this post on Instagram
View this post on Instagram