काही गाणी अशी असतात जी वाजताच आपसूकच पाय धूनवर हलू लागतात. लहान मुल असो किंवा वयोवृद्ध ते गाण्यावर दुलताना पाहायला मिळतात. अनेक वेळा डांस प्रेमी लोकांना हे कठीण जाते कि ते अशा ठिकाणी असतात जिथे अचानक डांस करणे त्यांना शोभा देत नाही, पण ते म्हणतात ना ह्रदय तर लहान मुलाप्रमाणे असते. जे अनेकवेळा प्रयत्न करून देखील स्वतःला थांबवू शकत नाही. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो एका शाळेतील शिक्षिकेचा आहे. ज्यांनी स्टेजवर चढून अमिताभ यांच्या प्रसिद्ध गाण्यावर डांस केला आहे.
हा व्हिडीओ pritykeshar या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. ज्यामधील शिक्षिकेचा डांसिंग अंदाज वेगाने व्हायरल होत आहे. शिक्षिका शाळेच्या फंक्शन दरम्यान स्टेजवर चढते आणि अमिताभ बच्चनचे फेमस गाणे ‘चुम्मा-चुम्मा लोगे’ गाण्यावर जबरदस्त डांस करताना पाहायला मिळते. या डांस व्हिडीओला ३१ हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.
सोशल मिडियावर शिक्षिकेचा बिनधास्त डांस व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे आणि लोक याला खूप पसंद देखील करत आहेत. अमिताभ बच्चनचे गाणे वाजताच शिक्षिका स्टेजवर गेली आणि बिग बीचे सिग्नेचर स्टेप्स करू लागली. यादरम्यान शिक्षिकेच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आत्मविश्वास लोकांना खूप प्रभावित करत आहे.
हा व्हिडीओ शाळेच्या alumni२३ मीटचा आहे. ज्यामध्ये शिक्षिकेने आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना पाहून आपला आनंद अशाप्रकारे व्यक्त केला कि विद्यार्थी देखील आपल्या शिक्षिकेचा हा नवीन अंदाज पाहून भारावून गेले. सध्या हा डांस व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
View this post on Instagram