HomeEntertainmentमनोरंजन विश्वावर शोककळा ! ‘तारक मेहता...’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन, ४० व्या...

मनोरंजन विश्वावर शोककळा ! ‘तारक मेहता…’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन, ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

तारक मेहता का उलटा चश्मा आणि इतर अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन करणारे आणि दर्शकांचे आवडते अभिनेते सुनील होळकर यांचे निधन झाले आहे. ४० वर्षाचे सुनील होळकर यांच्या कुटुंबामध्ये त्यांची आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांनी नॅशनल अवॉर्ड विनिंग चित्रपट गोष्ट एका पैठाणीचीमध्ये काम केले आहे.

माहितीनुसार सुनील होळकर लीवर सोरायसिस आजाराने ग्रस्त होते. अशामध्ये ती सतत डॉक्टर्स सोबत कंसल्ट करत होते. शुक्रवारी १३ जानेवारी रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तारक मेहता का उलटा चश्मा मधील त्यांची संस्मरणीय भूमिका आज देखील दर्शकांचा आठवणीत आहे.

सुनील होळकरला कदाचित आपल्या मृत्यूचा आधीच अंदाज लागला होता. आपल्या मित्राला सुनीलने शेवटचा मॅसेज लिहिला होता. व्हाट्स अॅपवर त्यांनी आपल्या मित्राला लिहिले होते कि त्यांची हि शेवटची पोस्ट आहे. त्यांना सर्वांचा निरोप घ्यायचा होता आणि सर्वांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानायचे होते. त्याचबरोबर सुनील यांना स्वतःकडून झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची होती. त्यांचा हा मॅसेज त्यांच्या मित्रांना पुढे पोस्ट केला.

सुनील होळकर यांच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अभिनेता अशोक हांडे चौरंग नाट्य संस्थेत काम केले. सुनीलला नेहमीच एक अभिनेता आणि कथावाचक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी १२ पेक्षा जास्त वर्षे थियेटरद्वारे रंगभूमीची सेवा केली. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्यांचे असे जाणे कलाविश्वाचे मोठे नुकसान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Holkar (@holkar_sunil)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts