‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये दयाबेन बनून घराघरात पोहोचलेली दिशा वकानी बऱ्याच दिवसांपासून लहान पडद्यापासून दूर आहे. अनेक वेळा मालिकेमध्ये दिशा च्या परत येण्याच्या बातम्या देखील येत होत्या, परंतु त्यामध्ये कोणतेही तथ्य नव्हते.
तर, आता सोशल मिडीयावर एक विडीओ खूप जास्त वायरल होत आहे. ज्यामध्ये दिशा तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल गोष्ट सांगताना दिसत आहे, विडीओ ला पाहिल्यानंतर चाहत्यांना समजत नाही कि दिशा च्या सोबत काय घडले आहे. तर जाणून घेऊया वायरल विडीओ मधील सत्य…
सोशल मिडीयावर वायरल होत असलेल्या विडीओ मध्ये दिशा वकानी एका बाळाला आपल्या मिठीत घेतले आहे. त्यासोबतच ती तिची दुखः गोष्ट सांगत आहे, जे सांगताना तिच्या डोळ्यातून पाणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. ती व्यवस्थेला दोष देत रडत आहे. दिशा च्या या विडीओ वर सोशल मिडिया युजर्स देखील वेगवेगळ्या कमेंट देत आहेत.
वास्तविक, हा वायरल विडीओ एका चित्रपटातील आहे. तो चित्रपट ‘सी कंपनी’ होता, जो २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये तुषार कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर प्रमुख भूमिकेत होते. तुषार कपूर पत्रकाराच्या भूमिकेत होता आणि जगासमोर दिशा वकानी ची कथा सांगत आहे. एका युजर ने लिहिले, ‘आता समजले दयाबेन एवढी हरवलेली का असते’. तर दुसऱ्या एकाने लिहिले, ‘तारक मेहता मध्ये परत जा’.
दिशा वकानी चे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमध्ये मागील काही दिवसांपासून परत येण्याच्या बातम्या येत होत्या. चाहत्यांना देखील वाटते कि दयाबेन मालिकेमध्ये परत यावी. परंतु त्याबद्दल काहीही माहिती नाही कि ती खरोखर मालिकेमध्ये परत येणार आहे कि नाही. अभिनेत्रीने चार्टर्ड अकौंटंट मयूर विडीया सोबत लग्न केले आहे. तर, दिशा दोन मुलांची आई आहे आणि तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. २०१७ मध्ये दिशा च्या मुलीचा जन्म झाला होता, तर २०२२ मध्ये तिने मुलाला जन्म दिला.
View this post on Instagram