टीव्ही जगतामधील सर्वात लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चश्मा शो गेल्या १४ वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. यादरम्यान शोमध्ये अनेक नवीन कलाकार जोडले तर अनेक जुन्या कलाकारांनी शोला निरोप दिला, ज्यामुळे चाहत्यांचे हृदय तुटले आहे.
तारक मेहता का उल्टा चश्माच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अनेक कलाकारांनंतर आता शोचे दिग्दर्शक मालव राजदाने शो सोडण्याची घोषणा केली आहे. ते गेल्या १४ वर्षांपासून तारक मेहताच्या कुटुंबाचा भाग होते. त्यान १५ डिसेंबर रोजी शोचे शेवटचे शुटींग केले होते.
प्रॉडक्शनशी संबंधी सूत्रांचे म्हणणे आहे कि मालव आणि प्रोडक्शन हाऊसदरम्यान मतभेद सुरु होते. तथापि जेव्हा याबद्दल मालवला विचारले गेले तेव्हा त्यांनी मतभेदांबद्दलचे दावे फेटाळले होते. त्यांनी म्हंटले कि जर तुम्ही चांगले काम करण्यासाठी तयार आहत तर टीममध्ये रचनात्मक मतभेद होतील पण हे नेहमी शोला उत्कृष्ट बनवण्यासाठी असते.
प्रोडक्शन हाऊससोबत माझे काही घेणेदेणे आहे. माझ्याजवळ फक्त शो आणि असित भाई साठी आभार आहेत. त्यांच्या बाहेर जाण्याचे मूळ कारण सांगताना मालन म्हणाला कि १४ वर्षे शो केल्यानंतर मला वाटले कि एका कम्फर्ट झोनमध्ये गेलो आहे. मी क्रिएटिव रूपाने पुढे जाण्याचा विचार केला आणि तिथून बाहेर पडणे आणि स्वतःला आव्हान देणे सर्वात चांगले समजले.
१४ वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी म्हंटले कि हि १४ वर्षे माझ्या जीवनातील सर्वात सुंदर वर्षे आहेत. या शोमधून मी फक्त पैसाच कमवला नाही तर प्रसिद्धी आणि माझी जोडीदार प्रिया आहूजा राजदाला देखील मिळवले. मालवच्या अगोदर अभिनेत्री नेहा मेहता, राज अनादकट आणि शैलेश लोढ़ाने शो सोडला होता. विशेष म्हणजे मालवची पत्नी, जी शोचा भाग ती देखील शो शोधण्याचा विचार करत आहे. सध्या ती मेकर्ससोबत चर्चा करत आहे.