बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या चांगलीच निशाण्यावर आली आहे. कधी ती पापाराझींशी चुकीच्या पद्धतीने वागते तर काही ती मिडियावर ओरडते. दिवंगत अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर जेव्हा तापसीला त्यांच्याबद्दल विचारले गेले होते तेव्हा तिने कॉमेडियनला ओळखण्यास नकार दिला होता.
नुकतेच तापसीसोबत असे काही झाले कि यूजर्स तिला खूपच वाईटरित्या ट्रोल करत आहेत. लोक अभिनेत्री तापसी पन्नूवर चांगलेच भडकले आहेत. लोकांनी तिच्यावर हिंदू देवीचा अपमान केल्याचा आरोप लावला आहे आणि तिला सोशल मिडियावर चांगलेच सुनावले जात आहे.
अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना गळ्यात हार घातला होता, हारमध्ये लक्ष्मी देवीची प्रतिमा बनली होती. हा नेकलेसच्या अडचणीचे मोठे कारण बनला आहे. लोकांनी या नेकलेसमुळे तिला निशाण्यावर घेतले आहे. तापसी पन्नूने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नेकलेस घातलेला फोटो आणि व्हिडीओ शेयर करताच लोक तिच्यावर चांगलेच भडकले.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि तापसी पन्नूने जो नेकलेस घातला आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा बनलेली होती. या नेकलेसला तापसीने लाल रंगाच्या लेनेंग्यासोबत घातले होते, ज्याचा गळा खूपच खोल होता. यामुळे अभिनेत्रीवर लोक चांगलेच भडकले आणि तिच्यावर माता लक्ष्मीचा अपमान करण्याचा आरोप लावला. लोक तापसी पन्नूला सोशल मिडियावर चांगलेच सुनावत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram