HomeBollywoodआईसोबत बसलेल्या या दोन्ही बहिणी आहेत सुपरस्टार, धाकट्या मुलीला तर बॉलीवूडमधील हिट...

आईसोबत बसलेल्या या दोन्ही बहिणी आहेत सुपरस्टार, धाकट्या मुलीला तर बॉलीवूडमधील हिट मशीन म्हणून ओळखले जाते…

सोशल मिडियावर सध्या एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये आईसोबत दोन मुली पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मुली मोठ्या होऊन आज बॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्री बनल्या आहेत. फोटोमध्ये एक मुलगी तिच्या आईच्या मांडीवर बसली आहे आणि दुसरी शेजारी उभी आहे.

दोघीहि बॉलीवूडमधील सुपरस्टार बहिणी आहेत. तुम्ही अजूनदेखील दोघींना ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. छोटी बहिण अजूनदेखील बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करते. इतकेच नाही तर तिला हिट मशीन म्हणून देखील ओळखले जाते.

जर तुम्ही या बहिणींना ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो या बहिणी कोण आहेत. फोटोमध्ये आईसोबत दिसत असलेल्या बहिणी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू आणि फरहा नाज आहेत. फोटोमध्ये आईच्या कुशीत बसलेली मुलगी तब्बू आहे तर बाजूला उभी असलेली मुलगी फरहा नाज आहे. आता हा फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

तथापि या फोटोमध्ये तब्बू आणि तिची बहिण फरहाला ओळखणे खूपच कठीण काम आहे. गेल्या वर्षी तब्बूचे भूल भुलैया २ आणि दृश्यम २ चित्रपट रिलीज झाले होते. दोन्हीहि चित्रपट सुपरहिट झाले होते. हेच कारण आहे कि अभिनेत्री तब्बूला हिट मशीन म्हणून ओळखले जाते.

याशिवाय तब्बूच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच पुन्हा एकदा अजय देवगनसोबत भोला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. भोला चित्रपटामध्ये तब्बू एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farha Naaz (@iamfarhanaaz)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts