टीव्ही जगतामधील फेमस कॉमिक शो तारक मेहता का उल्टा चश्मा चाहत्यांमध्ये खूपच फेमस आहे. सब टीव्हीवरील हा शो सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या शोपैकी एक आहे. हा शो २००८ पासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या सिरीयलमध्ये प्रत्येक शोमध्ये खूप मस्ती, मनोरंजन आणि सामाजिक ज्ञान मिळते.
या शोमधील प्रत्येक भूमिकेची एक वेगळी ओकाख आणि फॅन फॉलोइंग आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये अनेक कलाकार बाहेर पडत आहेत. दर्शकांना तेव्हा मोठा धक्का बसला होता जेव्हा या शोमधील मुख्य भूमिका तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढ़ाने हा शो सोडला होता.
आता हि बातमी समोर येत आहे कि या शोमधील आणखी एक मुख्य भूमिका गोकुलधाम सोसाइटीला रामराम करणार आहे. जर हि बातमी खरी ठरली तर दर्शकांना आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. या शोमधील चंपक चाचा म्हणजेच बाबूजीची भूमिका अभिनेता अमित भट्ट प्ले करत आहे.
नुकतेच शुटींग दरम्यान ते गंभीर जखमी झाले आहेत. डॉक्टरांनी अमितला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगामी काही भागांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. यामुळे चंपक चाचा आणि जेठा लालचे बाबूजी सध्या शोमध्ये दिसत नाहीत. दर्शक देखील त्यांना शोमध्ये खूपच मिस करत आहेत.
चंपक चाचा शोमध्ये दिसत नसल्यामुळे मिडियामध्ये त्यांच्यामध्ये आणि मेकर्समध्ये भांडण झाल्याची बातमी पसरली आहे. वास्तविक शोमध्ये अनेक कलाकारांचे मेकर्ससोबत भांडण होत असल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामुळे अमित शोमध्ये पाहायला मिळत नाही आहे. आता दर्शकांना वाटू लागले आहे कि त्यांनी देखील शो सोडला आहे. पण मेकर्स कडून अजून अधिकृतपणे अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.